युजर्सना खुश करण्यासाठी जियोची मोठी ऑफर; या दोन प्लॅन्सवर फ्री मिळतील 6500 रुपयांचे बेनिफिट्स

Jio Diwali Offer: Reliance Jio नं आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक मोठ्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीनं ब्रॉडबँड सर्व्हिस JioFiber घेणाऱ्या नव्या व जुन्या युजर्ससाठी या फेस्टिव ऑफरची घोषणा केली आहे, ज्यात कंपनी आपल्या ग्राहकांना 6500 रुपयांच्या बेनिफिट्ससह 15 दिवसांची अतिरिक्त फ्री सर्व्हिस देत आहे. जर तुम्हाला देखील या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर याची संपूर्ण माहिती आम्ही पुढे दिली आहे.

या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार जियो ऑफरचा फायदा जियोफायबरच्या दोन प्लॅन्स सोबत दिला जात आहे. या प्लॅन्सच्या किंमती 599 रुपये आणि 899 रुपये (टॅक्स एक्स्ट्रा) आहे. जर एखादा युजर JioFiber 599 Plan किंवा JioFiber 899 Plan घेत असेल तर या ऑफरचा फायदा घेता येईल. या दोन प्लॅन्सद्वारे रिचार्ज केल्यावर किंवा नवीन कनेक्शन घेतल्यावर तुम्हाला 6500 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळतील. परंतु तुम्हाला कमीत कमी 6 महिन्यांसाठी प्लॅन घ्यावा लागेल. या प्लॅनसह अतिरिक्त 15 दिवसांची वैधता देखील मोफत मिळेल. हे देखील वाचा: विवोचा स्वस्त 5G फोन झाला आणखी स्वस्त; 4,000 रुपयांच्या डिस्काउंटसह Vivo T1 5G उपलब्ध

6500 रुपयांमध्ये मिळतील हे फायदे

599 रुपयांचा प्लॅनमध्ये 4,500 रुपयांचा बेनिफिट्स मिळतील. या प्लॅनमध्ये रिलायन्स डिजिटलवर 1000 रुपयांची सूट, Netmads वर 1000 रुपयांची सूट, Ajio वर 1000 रुपयांची सूट आणि Ixigo वर 1500 रुपयांची सूट मिळेल. तर, 899 रुपयांचा प्लॅनमध्ये ग्राहकांना रिलायन्स डिजिटलवर 1,000 रुपये, Netmads वर 500 रुपये, Ajio वर 2000 रुपये आणि Ixigo वर 3000 रुपयांचे डिस्काउंट कुपन मिळतील.

जियो ऑफरची लास्ट डेट

Jio Offer 18 ऑक्टोबरपासून लाइव्ह झाली आहे. तसेच या ऑफरची लास्ट डेट 28 ऑक्टोबर आहे. या ऑफर का लाभ घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या कस्टमर केयरशी संपर्क साधू शकता. तसेच ऑफरमध्ये मिळणाऱ्या कुपनची एक्सपायरी डेट डेट जियो अ‍ॅपवर बघता येईल. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि चकाचक डिस्प्लेसह येतोय सर्वात शक्तिशाली OnePlus 11; लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Reliance Jio Adds Over 29 Lakh Mobile Subscribers Before Ambani 5G Service

Jio Broadband Plan

Jio Rs 599 and Rs 899 Broadband Plan: 599 रुपयांचा प्लॅनसह 30 एमबी प्रति सेकंड स्पीडसह 3.3 टीबी मंथली डेटा आणि 15 पेक्षा जास्त ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये 550 पेक्षा जास्त ऑन-डिमांड टीव्ही चॅनेल्स आणि लँडलाइनचा फायदा मिळेल. तर 899 रुपयांचा प्लॅनसह तुम्हाला 599 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील. 899 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना 100 एमबी प्रति सेकंडचा स्पीड मिळेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here