Categories: बातम्या

Jio चे 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 3 प्लान, देतील रोज 2GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग

भारतात सध्या सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio आपल्या युजर्सचा विचार करून नवनवीन स्कीम सादर करून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. युजर्सना पण कंपनीचे नवीन आणि शानदार प्लान खूप आवडत आहेत. कंपनीकडे अनेक अश्या प्लानची मोठी यादी आहे ज्यात कंपनी कमी किंमतीत बेस्ट डेली डेटा बेनिफिट आणि फ्री कॉलिंगसह अनेक अतिरिक्त बेनिफिट पण देत आहे. पण, जर तुम्ही जियोचे प्रीपेड युजर्स असाल आणि कमी किंमतीत जास्त बेनिफिट असलेला रिचार्ज करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी कंपनीच्या तीन अश्या प्लानची यादी घेऊन आलो आहोत, ज्यांची किंमत 250 रुपयांपेक्षा कमी आहे. या किंमतीत येणाऱ्या कंपनीचे टॉप 3 जियो प्रीपेड प्लान्सबाबत चला जाणून घेऊया. (Jio best prepaid plan under Rupees 250)

Jio चा 149 रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये युजर्सना 24 दिवसांच्या वॅलिडिटीसह रोज 1जीबी डेटा मिळतो. तसेच प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि डेली 100 फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. इतकेच नव्हे तर प्लानमध्ये मिळणार अतिरिक्त बेनिफिट्स पाहता, यात पण कंपनीच्या दुसऱ्या प्लान प्रमाणेच जियो अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

हे देखील वाचा : लो बजेटमध्ये शांत आहे VIVO, वाढत आहे स्वस्त फोनची प्रतीक्षा

Jio चा 199 रुपयांचा प्लान

हा प्लान कंपनीने आपल्या बेस्टसेलरच्या यादीत ठेवला आहे. इतकेच नव्हे तर हा सर्वात कमी किंमत असलेला Jio चा Best Seller प्रीपेड प्लान पण आहे. जियोच्या 199 रुपयांच्या प्लानमध्ये डेली 1.5 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर फ्री आणि डेली 100 एसएमएसची सुविधा मिळते. तसेच कंपनी जियो अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन पण ऑफर करत आहे. जियोच्या या प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 28 दिवस आहे.

हे देखील वाचा : ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट चीनमध्ये झाला लॉन्च, MediaTek प्रोसेसर आणि 7300mAh बॅटरी

Jio चा 249 रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये युजर्सना 28 दिवसांच्या वॅलिडिटी मिळते. इतकेच नव्हे 28 दिवस युजर्सना रोज 2जीबी डेटा मिळतो जो एकूण 56जीबी डेटा होतो. तसेच प्लानमध्ये कंपनी रोज 100 फ्री एसएमएससह देशातील कोणत्याही नेटवर्कसाठी कॉलिंग मोफत देत आहे. दुसऱ्या प्लान्स प्रमाणेच या रिचार्जमध्ये जियो अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

Published by
Kamal Kant