ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट चीनमध्ये झाला लॉन्च, MediaTek प्रोसेसर आणि 7300mAh बॅटरी

ASUS Adolpad 10 Pro चा फोटो

ASUS ने होम मार्केट चीनमध्ये नवीन अँड्रॉइड टॅबलेट ASUS Adolpad 10 Pro सादर केला आहे. या टॅबमध्ये कंपनीने 10.1 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच मीडियाटेकच्या ऑक्टा कोर प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आलेल्या या टॅबमध्ये 4GB रॅम देण्यात आला आहे. तसेच आसुसच्या या टॅबमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटमध्ये कंपनीने दमदार 7,300mAh ची बॅटरी दिली आहे. इथे आम्ही तुम्हाला ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत सविस्तर माहिती देत आहोत. (Asus Adolpad 10 Pro launched check price and specifications)

ASUS Adolpad 10 Pro स्पेसिफिकेशन्स

ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटमध्ये कंपनीने 10.1 इंचाचा Full HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. या टॅबमध्ये देण्यात आलेल्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1920 x 1200 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 16:10 आहे. ASUS Adolpad 10 Pro मध्ये युजर्सना दमदार परफॉर्मन्स मिळण्यासाठी या टॅबमध्ये ऑक्टाकोर MediaTek 8183 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच टॅबमध्ये 4GB RAM आणि 128GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : गेमिंग फोन Redmi Note 10S भारतीय लॉन्चसाठी तयार, देईल का Realme ला मात?

MediaTek 8183 चिपसेट साल 2019 मध्ये सादर केला होता. हा चिपसेट कंपनीने टॅबलेट्ससाठी तयार केला होता जो 12nm प्रोसेसवर बनला आहे. या चिपसेटमध्ये 8 CPU कोर आहेत, ज्यात चार पावरफुल Cortex-A73 आणि चार छोटे Cortex-A53 कोर आहेत. या चिपसेटमध्ये इंटिग्रेटेड ग्राफिक्स ARM Mali-G72 देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : लो बजेटमध्ये शांत आहे VIVO, वाढत आहे स्वस्त फोनची प्रतीक्षा

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच या टॅबच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या टॅबची जाडी 8.4mm आणि याचे वजन 540 ग्राम आहे.

ASUS Adolpad 10 Pro टॅब अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या टॅबमध्ये कंपनीने 7,300mAh ची बॅटरी दिली आहे. आसुसचा दावा आहे कि सिंगल चार्जमध्ये हा सहा तासांचा बॅटरी बॅकअप ऑफर करतो. चार्जिंगसाठी या टॅबमध्ये Type C पोर्ट दिला आहे.

ASUS Adolpad 10 Pro किंमत

ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट कंपनीने चीनमध्ये सिंगल वेरिएंटमध्ये सादर केला आहे. या टॅबचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला वेरिएंट 1,599 युआन (करीब 18,200 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. चीनमध्ये या टॅबची प्री बुकिंग सुरु झाली आहे. हा टॅब भारतीय बाजारात लॉन्च होईल कि नाही याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here