OTT वर या दिवशी येणार शाहरुख खानचा Pathaan, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही फिल्म

Highlights

  • Pathaan मोठ्या पडद्यावर January 25th, 2023 ला रिलीज केला जाईल.
  • चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासह जॉन अब्राहम देखील आहे.
  • Pathaan अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज केला जाईल.

बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असलेल्या शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ पुढील आठवड्यात रिलीज होण्यासाठी तयार आहे. संपूर्ण चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणार शाहरुखच्या पहिल्या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात Pathaan OTT Release Date आणि ओटीटी डील बाबत माहिती देण्यात आली आहे. bollywoodlife च्या बातमी नुसार पठाण 25 एप्रिलला ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होईल.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अलीकडेच हाय कोर्टानं यशराज फिल्म्सला पठाणच्या ओटीटी रिलीजमध्ये काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांना सर्टिफिकेशनसाठी पुन्हा हा चित्रपट सीबीएफसीला सबमिट करावा लागेल. दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठाण’ ला आधीच सेंट्रल फिल्म सर्टिफिकेशन बोर्डकडून अप्रूवल मिळालं आहे.

इथे पाहा पठाणचा ट्रेलर

या दिवशी मोठ्या पडद्यावर रिलीज होईल पठाण

कोर्टानं पठाणच्या निर्मात्यांना 20 फेब्रुवारी पर्यंत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी चर्चा आहे. सेन्सर बोर्डला सांगण्यात आलं आहे की त्यांनी 10 मार्च पर्यंत निर्णय द्यावा. परंतु चित्रपटगृहतील रिलीजवर कोर्टानं कोणतेही निर्देश दिले नाहीत, कारण चित्रपट रिलीजसाठी फक्त 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. चित्रपट मोठ्या पडद्यावर 25 जानेवारीला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज केला जाईल.

बॉलिवुडच्या बादशाह Shah Rukh Khan आणि Deepika Padukone व्यतिरिक्त John Abraham महत्वाच्या भूमिकेत दिसेल. पठाण को हिंदी व्यतिरिक्त तेलुगु आणि तामिळमध्ये देखील रिलीज केला जाईल. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे तर आदित्य चोपडानं निर्मिती केली आहे.

याआधी बातमी आली होती की हा चित्रपट थिएटर रिलीज नंतर काही महिन्यांनी Amazon Prime Video ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. अ‍ॅमेझॉननं कोट्यवधी रुपयांमध्ये या चित्रपटाचे डिजिटल अधिकार खरेदी केल्याची बातमी आली आहे, परंतु निर्मात्यांकडून किंवा प्राइम व्हिडीओकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वादग्रस्त चित्रपट

4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर किंग खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, काही महिन्यांपूर्वी शाहरुख रॉकेटरी चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. इतक्या वर्षांनंतर पुनरागमन करत असलेल्या किंग खानचा चित्रपट पठाणमधील गाणं ‘बेशर्म रंग’ वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीबद्दल खूप मोठा वादंग निर्माण झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here