देशात 5G Services च्या लाँचसाठी जास्त दिवस उरले नाहीत त्यामुळे टेलीकॉम कंपन्या व टेक ब्रँड्स युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रोडक्ट्स व प्लॅन्स तयार करत आहेत. सुपर फास्ट 5G Internet ची प्रतीक्षा सर्वांना आहे. Reliance Jio, Airtel आणि Vi कंपन्यांना 5G Spectrum मिळालं आहे आणि 5जी रोलआउटच्या देशाची वाटचाल सुरू आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी रिलायन्स जियो 5जी सर्व्हिस सोबतच Jio Phone 5G देखील लाँच करू शकते.
Jio Phone 5G
4G फीचर फोन Jio Phone आणि Google सह मिळून बनवलेल्या 4G Smartphone Jio Phone Next नंतर आता अंबानींची कंपनी रिलायन्स जियो आपला 5जी फोन देखील सादर करू शकते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आली नाही परंतु विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये 5जी नेटवर्क सपोर्ट असलेल्या जियो फोन 5जी उल्लेख केला जात आहे. लीक्समध्ये या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स देखील शेयर केले जात आहेत. आशा आहे की कंपनीच्या अन्य मोबाइल फोन्स प्रमाणे खूप कमी किंमतीत हा फोन देखील लाँच केला जाईल.
Jio Phone 5G ची किंमत
4जी फीचर फोन जियोफोन आणि 4जी स्मार्टफोन जियोफोन नेक्स्ट प्रमाणेच 5जी मोबाइल जियोफोन 5जी देखील लो बजेटमध्ये येईल. हा भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन म्हणून सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. वास्तवात फोनची किंमत किती असेल हे स्पष्ट झालं नाही, परंतु काही रिपोर्ट्सनुसार JioPhone 5G ची किंमत 12,000 रुपये सांगण्यात आली आहे जो Jio 5G Plans सह फक्त 2,000 रुपयांमध्ये मिळू शकतो.
बातमीनुसार जियो फोन 5जी कंपनीच्या बंडल ऑफरसह येईल. या फोनसह काही जियो 5जी प्लॅन्स देखील सादर केले जातील. या जियो प्लॅन्सचा रिचार्ज केल्यावर जियो फोन 5जीची इफेक्टिव प्राइस फक्त 2,000 रुपये होईल. उर्वरित रक्कम 5G Recharge Plan व 5G Data शुल्कसह देता येईल.
Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.5 HD+ Display
- 4GB RAM
- 32GB Storage
- Pragati OS
- Qualcomm Snapdragon 480 5G
- 13MP + 2MP Rear Camera
- 8MP Selfie Camera
वर सांगितल्याप्रमाणे रिलायन्स जियोकडून आतापर्यंत कंपनीच्या 5जी मोबाइल फोन जियो फोन 5जी बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु लीक्समध्ये या फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स शेयर केले जात आहेत. या लीक्सनुसार Jio Phone 5G कंपनीच्या 4जी स्मार्टफोन Jio Phone Next पेक्षा जास्त वेगळा नसेल तसेच यात प्रामुख्याने 5G Bands च अपग्रेड केले जातील.
Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर असेल. फोनमध्ये 60हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो तसेच स्क्रीनला ग्लास प्रोटेक्शन देखील दिलं जाऊ शकतं. लीक्स नुसार जियोफोन 5जी चा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईल सह येईल.
जियोफोन 5जी मध्ये प्रगती ओएस दिला जाऊ शकतो जो आपण याआधी जियोफोन नेक्स्ट lमध्ये दिसला आहे. या ऑपरेटिंग सिस्टमची निर्मिती Google नं खास भारतीय मोबाइल युजर्ससाठी केली आहे ज्यात भारतीय भाषांचा सपोर्ट देखील मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला जाऊ शकतो.
Jio Phone 5G 4 जीबी रॅमसह लाँच होईल ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनमध्ये इंटरनल मेमरी कमी असेल परंतु यात एक्स्ट्रनल मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल आणि फोनमध्ये स्टोरेज वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. लीक्स नुसार हा 5जी फोन 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करेल, जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. हा सेकंडरी सेन्सर एक मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आतापर्यंत कोणत्याही लीक किंवा रिपोर्टमध्ये JioPhone 5G च्या बॅटरीची माहिती समोर आली नाही.














