वोडाफोन-आयडियाचं 5G कधीच येणार नाही का? जाणून घ्या का मागे आहे कंपनी

Vodafone-Idea म्हणजे Vi आर्थिक अडचणींचा सामना करत आहे आणि कंपनीनं अजूनही आपले 5G बेस स्टेशन नेटवर्क उभारलं नाही. यंदा 1 ऑक्टोबरला भारतात 5जी सर्व्हिसचा शुभारंभ झाला आहे, तेव्हापासून देशातील अन्य दोन खाजगी टेलिकॉम कंपन्या अर्थात एयरटेल आणि जियो दर आठवड्याला जवळपास 2,500 बेस स्टेशन उभारत आहेत. केंद्र सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना दर आठवड्याला कमीत कमी 10,000 बेस्ट स्टेशन उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रश्न पडला आहे की ‘वोडाफोन-आयडियाचं 5G कधीच येणार नाही का?’

5जी बेस स्टेशन उभारण्याच्या शर्यतीत भारतात सध्या रिलायन्स जियो आघाडीवर आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनीनं 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत देशभरात सुमारे 17,687 बेस स्टेशन उभारले आहेत. जियोनं 10 राज्यांत आपली Jio True 5G सेवा मोफत लाँच केली आहे. दुसरीकडे एयरटेलनं 3,293 बेस स्टेशन उभारले असून भारतातील 13 राज्यांमधील ग्राहकांना आपली Airtel 5G Plus सेवा मोफत दिली आहे. हे देखील वाचा: अँड्रॉइडचा बाहुबली येतोय! लाँचपूर्वीच OnePlus 11 चे ‘ए टू झेड’ स्पेसिफिकेशन्स आले समोर, जाणून घ्या पावर

मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर कम्युनिकेशन देवूसिंह चौहान यांनी राज्य सभेत सांगितलं आहे की 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत दोन्ही कंपन्यांनी मिळून देशात एकूण 20,980 5जी बेस स्टेशन उभारले आहेत. एकीकडे एयरटेल आणि जियो आपल्या 5जी रोलआऊट प्लॅनची माहिती देत आहेत, तर दुसरीकडे टेलिकॉम बाजारातील तिसरा खाजगी खेळाडू अजूनही शांत आहे. वोडाफोन-आयडियाचा भारतातील 5जी रोलआऊटचा प्लॅन अजूनही गुलदस्त्यात आहे.

वोडाफोन-आयडियाच्या प्रवक्त्यांनी घोषणा केली आहे की कंपनीनं अनेक प्रमुख OEM (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर) सोबत ग्राहकांना 5जी सेवा देण्यासाठी भागेदारी केली आहे. कंपनीनं काही महिन्यांपूर्वी झालेल्या लिलावात 5जी स्पेक्ट्रम देखील खरेदी केलं आहे. परंतु तरीही एकीकडे जियो आणि एयरटेल आपल्या पब्लिक स्टेटमेंटमधून आपल्या नव्या नेटवर्कची माहिती देत आहेत आणि दुसरीकडे वोडाफोन आयडिया अजूनही 5G च्या मैदानात उतरली नाही, हे कोडं अजूनही सुटलं नाही. हे देखील वाचा: New OTT releases this week: बहुचर्चित ‘थँक गॉड’ आणि पिचर्स येतायत ओटीटीवर, पाहा संपूर्ण यादी

5जी सर्व्हिसच्या अभावामुळे वोडाफोन-आयडिया आपले ग्राहक गमावू शकते कारण इतर टेलिकॉम कंपन्यांनी अनेक राज्यांमध्ये 5जी सेवा सुरु केली आहे. Vi ग्राहक गमावत आहे, हे काही आता लपून राहील नाही आणि पुढील सहा महिन्यांमध्ये अजून ग्राहक कंपनीचा निरोप घेऊ शकतात. रिपोर्ट्समधून माहिती मिळाली आहे की जर पुढील दोन महिन्यांमध्ये प्रमोटर्सकडून नवीन भांडवल आलं नाही तर वोडाफोन आयडियाचं भारतातील अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here