Jio युजर्ससाठी खुशखबर! कंपनी साइटवर लिस्ट झाले 19 रुपये आणि 29 रुपयांचे डेटा प्लॅन

Highlights

  • 19 रुपये आणि 29 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये 2.5जीबी पर्यंत डेटा मिळेल.
  • दोन्ही रिचार्ज युजर्स ऑनलाइन व ऑफलाइन करू शकतात.
  • डाटा व्यतिरिक्त रिचार्जमध्ये आणि कोणताही फायदा मिळणार नाही.

टेलिकॉम कंपनी Reliance Jio नं पुन्हा एकदा आपल्या युजर्सच्या सोयीसाठी नवे प्लॅन सादर केले आहेत. नवीन व जुन्या युजर्ससाठी कंपनीनं दोन नवीन स्वस्त डेटा प्लॅन्स वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. ह्या प्रीपेड डेटा प्लॅनवर युजर्सना 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया जियो कोणत्या प्लॅन्सवर कोणते फायदे देत आहे.

ऑनलाइन व ऑफलाइन करता येईल रिचार्ज

वेबसाइटवर लिस्ट झालेल्या नवीन प्लॅनची किंमत 29 रुपये आणि 19 रुपये आहे. हे प्लॅन्स तुम्हाला जियो स्टोरसह ऑनलाइन कंपनीच्या साइट व थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर देखील रिचार्जसाठी उपलब्ध होतील. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनीनं हे प्लॅन फक्त इन स्टोर ऑफर अंतगर्त सादर केले होते. त्यामुळे फक्त जियोच्या दुकानात जाऊनच रिचार्ज करता येत होता, परंतु आता ह्यात बदल झाला आहे.

जियोचा 19 रुपयांचा प्रीपेड पॅक

कंपनीच्या 19 रुपयांच्या प्रीपेड डेटा पॅकमध्ये एकूण 1.5GB डेटा दिला जात आहे. ह्याची व्हॅलिडिटी देखील तुमच्या आधीच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅन इतकी असेल. हा प्लॅन 15 रुपयांच्या जुन्या प्लॅनमधील डेटा वाढवून डिजाइन करण्यात आला आहे, ज्यात 1GB डेटा मिळतो.

जियोचा 29 रुपयांचा प्रीपेड पॅक

29 रुपयांच्या प्रीपेड डेटा पॅक पाहता ह्यात एकूण 2.5GB डेटा ऑफर केला जात आहे. त्याचबरोबर ह्या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील तुमच्या सक्रिय प्लॅन इतकी असेल. तसेच कंपनीच्या 25 रुपयांच्या जुन्या प्लॅनमध्ये 2GB डेटा मिळतो.

न्यू जियो 4जी फोन

अलीकडेच रिलायन्स जियोनं आपला फीचर फोन ‘जियो भारत 4G’ सादर केला होता. जो 3 जुलैला 999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता. कंपनी ह्या फोनच्या माध्यमातून त्या ग्राहकांना लक्ष करू इच्छित आहे जे अजूनही 2G फोन वापरत आहेत. तसेच कंपनीनं ह्या फोनसाठी कंपनीनं 123 रुपयांचा टॅरिफ प्लॅन देखील सादर केला आहे. ह्यात 14 GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि 28 दिवसांची वैधता दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here