Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल 84 दिवसांची व्हॅलिडिटी, फक्त My Jio अ‍ॅपवर प्लॅन उपलब्ध

jio 5g works on 4g sim
Highlights

  • Jio rs 395 recharge plan मध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.
  • रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिडेट व्हॉइस कॉलची सुविधा आहे.
  • Jio rs 395 रिचार्ज प्लॅनमध्ये फक्त 6GB डेटा मिळतो.

Jio rs 395 recharge plan: Jio सध्या देशातील नंबर वन टेलीकॉम ब्रँड आहे. हीयह टेलीकॉम कंपनी स्वस्त डेटा प्लॅन सादर करण्यासाठी ओळखली जाते. एकीकडे मासिक रिचार्ज प्लॅनच्या किंमती सतत वाढत आहेत. तुम्हाला एक महिना किंवा 28 दिवसांच्या वैधतेच्या डेटा प्लॅनसाठी आता कमीत कमी 200 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. या योजना डेली डेटा कॅपसह येतात. Jio कडे एक स्पेशल रिचार्ज प्लॅन आहे, जो फक्त My Jio अ‍ॅपवर उपलब्ध आहे. या प्लॅनची किंमत फक्त 141 रुपये दरमहा किंवा 84 दिवसांसाठी 395 रुपये आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती.

Jio 395 recharge plan चे फायदे

Jio चा 395 प्रीपेड रिचार्ज प्लॅन My Jio अ‍ॅप वर उपलब्ध आहे. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता, 6GB डेटा, 1000 एसएमएस आणि संपूर्ण वैधतेच्या कालावधीत अमर्याद कॉलची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधतेसाठी फक्त 6GB डेटाची सुविधा मिळते म्हणजे रोज 6GB डेटा मिळत नाही. त्यामुळे हा प्लॅन त्या लोकांसाठी नाही ज्यांना रोज 1/2GB मोबाइल डेटा वापरायचा आहे. हे देखील वाचा: दगडासारखा दणकट फोन! Doogee S100 मध्ये 10800mAh बॅटरी आणि 12GB रॅम

परंतु हा प्लॅन त्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो जे व्हॉइस कॉलसाठी आपला फोन नंबर वापरतात आणि ज्यांच्याकडे वाय-फाय नेटवर्कची सुविधा आहे. हा प्लॅन तुम्हाला खूप पैसे वाचवण्यासाठी मदत करू शकतो. जरी डेटा संपला तरी तुम्ही अ‍ॅड-ऑन डेटा प्लॅन घेऊ शकता. जियो 15 रुपयांमध्ये 1GB 4G डेटा, तसेच 25 रुपयांमध्ये 2GB डेटा देते.

अमर्याद 5G नेटवर्कचा फायदा

जियो वेलकम ऑफर (Jio Welcome Offer) मध्ये मोफत अमर्याद 5G नेटवर्कचा अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे. जर युजर्स त्या निवडक शहरांमध्ये राहत असतील जिथे जियोचं 5जी नेटवर्क उपलब्ध आहे, तर 1Gbps पर्यंतच्या डाउनलोड स्पीडसह हाय-स्पीड 5G डेटाचा आनंद घेता येईल. हे देखील वाचा: Vivo V27 Pro Price in India: लाँचपूर्वीच समोर आली माहिती, इतकी असेल किंमत

रिचार्ज कसा करायचा

तुमच्या स्मार्टफोनवर My Jio अ‍ॅप डाउनलोड करा, लॉग इन करा आणि मेन्यूमध्ये रिचार्ज पर्यायावर क्लिक करा. पुढील पेजवर ‘व्हॅल्यू’ रिचार्ज प्लॅन्स पर्यंत जाण्यासाठी उजवीकडे स्वाइप करा आणि 395 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर क्लिक करा. त्यानंतर पेमेंट करून रिचार्जची प्रोसेस पूर्ण करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here