Jio सबस्क्राइबर्सची संख्या झाली कमी, पुढे गेली BSNL

टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने 31 डिसेंबर 2019 पर्यंतचा सब्सक्राइबर्स डेटा प्रसिद्ध केला आहे. या डेटा रिपोर्ट मध्ये कंपन्यांच्या सब्सक्राइबर्सच्या संख्येची माहिती देण्यात आली आहे. ट्राईच्या रिपोर्टनुसार सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी Reliance Jio ला मागे टाकेल आहे.

BSNL ने डिसेंबर 2019 मध्ये 4.2 लाख सब्सक्राइर्स जोडले आहेत, याबाबतीत कंपनी पहिल्या क्रमांकावर राहिली होती. तर दुसऱ्या स्थानावर Jio आहे, जिने 82,308 नवीन सब्सक्राइबर्स जोडले आहेत. रिपोर्टनुसार प्रीपेड टॅरिफ वॉर मध्ये BSNL पुढे जात आहे असे दिसत आहे.

विशेष म्हणजे Jio च्या लॉन्च नंतर डिसेंबर 2019 असा पहिला महीना होता जेव्हा कंपनीने 5 मिलियन पेक्षा कमी यूजर्स जोडले आहेत. तसेच वोडाफोन-आइडिया आधीप्रमाणे आपले सब्सक्राइबर्स गमावत आहेत. 2019 नोव्हेंबर मध्ये कंपनीचा मार्केट शेयर 29.12 टक्के होता जो डिसेंबर मध्ये कमी होऊन 28.89 टक्के राहिला आहे.

Airtel बद्दल बोलायचे झाले तर एयरटेलला 11 हजार यूजर्सचे नुकसान झेलावे लागले आहे. नीट बघितले तर वाढलेल्या टॅरिफचा सर्वात जास्त परिणाम Vodafone-Idea आणि Airtel वर झाला आहे.

विशेष म्हणजे Jio ने अलीकडेच रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि 2019 च्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जियो नेटवर्क वर 1208 कोटी जीबी इंटरनेट डेटा वापरला गेला आहे. तसेच वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हा वापर 1202 कोटी जीबी होता. रिपोर्ट्नुसार साल 2018 च्या शेवटाच्या तुलनेत साल 2019 च्या शेवटी जियो नेटवर्क वर इंटरनेटचा वापर 39.9 टक्के वाढला आहे. तसेच एप्रिल-मे-जून मध्ये Jio यूजर्सनी 81,264 कोटी मिनिटांची वॉयस कॉलिंग केली होती तर ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये Jio ग्राहकांनी फोन वर 82,640 मिनिटे कॉलिंग केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here