Moto G Play (2023) स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेटसह अमेरिकन बाजारात लाँच

Motorola लवकरच टेक मार्केटमध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Moto X40 सादर करणार आहे, जो क्वॉलकॉमच्या सर्वात वेगवान प्रोसेसरसह बाजारात येईल. परंतु तत्पूर्वी कंपनीनं आज एक नवीन लो बजेट मोबाइल फोन Moto G Play (2023) अमेरिकेत लाँच केला आहे. मोटो जी प्ले (2023) स्मार्टफोन 90hz display, 16MP Camera, 3GB RAM, MediaTek Helio G37 चिपसेट आणि 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. Moto G Play (2023) स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपयांच्या आसपास आहे आणि हा पुढील महिन्यात अमेरिका व कॅनडामध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Moto G Play (2023) चे स्पेसिफिकेशन्स

मोटो जी प्ले (2023) स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस टीएफटी एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हा फोन पंच-होल स्टाईल स्क्रीनला सपोर्ट करतो ज्यात तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला नॅरो चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 8 हजारांच्या रेंजमध्ये 8GB रॅम असलेले फोन; 5000mAh च्या बॅटरीसह Samsung Galaxy M04 भारतात लाँच

Motorola Moto G Play (2023) स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेट देण्यात आला आहे. हा मोटो मोबाइल 3 जीबी रॅमला सपोर्ट करतो जोडीला 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Moto G Play (2023) ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, सोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो जी प्ले 2023 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Moto G Play (2023) आयपी52 रेटेड स्मार्टफोन आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: विवोचा स्वस्त आणि मस्त 5जी मोबाइल लाँच; 8GB RAM सह Vivo Y35 5G Phone ची एंट्री

Moto G Play (2023) ची किंमत

मोटोरोलानं मोटो जी प्ले (2023) स्मार्टफोन अमेरिकन बाजारात सादर करण्यात आला आहे ज्याची किंमत $169.99 आहे. ही प्राइस भारतीय करंसीनुसार 14 हजार रुपयांच्या आसपास आहे. Motorola Moto G Play (2023) भारतीय बाजारात लाँच होईल किंवा नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here