रियलमीची नवीन स्मार्टफोन Realme 10 सीरिज जागतिक बाजारात लाँच झाली आहे. Realme 10 4G Phone ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. हा रियलमी स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 चिपसेटसह आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे, जो आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. कंपनीनं अजूनही रियलमी 10 4जीची इंडिया लाँच डिटेल शेयर केली नाही परंतु 91मोबाइल्सला हा फोन बाजारात येण्यापूर्वीच माहिती मिळाली आहे की Realme 10 4G भारतात किती व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल.
Realme 10 4G चा भारतीय लाँच
91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की रियलमी 10 4जी फोन बेहद जल्द भारतीय बाजारात एंट्री येऊ शकतो. सोर्सनुसार हा रियलमी मोबाइल भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. यातील Realme 10 4G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मिळू शकते. तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आणि मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 256GB storage दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत आला OnePlus Nord N20 SE; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतीयांच्या भेटीला
जागतिक बाजारात Realme 10 4G फोन पाच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला होता. इंटरनॅशनल बाजारात हा फोन 6 जीबी रॅमसह देखील सेलसाठी उपलब्ध झालं आहे परंतु हा मॉडेल भारतात येणार नाही. किंमत पाहता ग्लोबल मार्केटमध्ये रियलमी 10 4जी प्राइस 18 हजारांच्या बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आशा आहे की Realme 10 4G भारतात 16,000 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच होऊ शकतो.
Realme 10 4G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जुना स्टॉक संपवण्यासाठी OnePlus 10 Pro वर मोठी सूट; नव्या फ्लॅगशिपसाठी जागा बनवण्याची तयारी सुरु
Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
















