JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक

Highlights

  • JioCinema वर लवकरच सब्सक्रिप्शन लागू होणार आहे.
  • IPL 2023 संपल्यावर जियोसिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
  • रिपोर्टनुसार जियोसिनेमाचे तीन प्रकारचे सब्सक्रिप्शन असतील.

JioCinema सध्या सर्व युजर्ससाठी फ्री आहे. परंतु, कंपनी आपल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सब्सक्रिप्शन प्लॅन लागू करणार आहे. अजूनतरी जियो सिनेमाच्या प्रीमियम प्लॅनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत घोषणा कंपनीनं केली नाही. याची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. परंतु काही सोशल मीडिया ईन्फ्लूएंसर्सनी JioCinema Premium च्या किंमती सोशल मीडिया रेडिटवर शेयर केल्या आहेत. चला पुढे सविस्तर जाणून घेऊया.

Reddit वर समोर आलेल्या लीकनुसार जियोसिनेमाचे तीन सब्सक्रिप्शन समोर आले आहेत. विशेष म्हणजे यातील बेस प्लॅनची किंमत 2 रुपये असेल, ज्याची वैधता 1 दिवस आणि दोन डिवाइसचा सपोर्ट मिळेल. परंतु याची खरी किंमत 29 रुपये आहे. तसेच 3 महिन्यांच्या गोल्ड प्लॅनची किंमत 99 रुपये आणि यात देखील दोन डिवाइसचा सपोर्ट देण्यात येईल, ज्याची मूळ किंमत 299 रुपये आहे. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो Vivo Y36 4G; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

त्याचबरोबर जियोसिनेमाच्या प्लॅटिनम प्लॅनची किंमत 599 रुपये आहे जो 12 महिन्यांच्या वैधतेसह येतो. याची मूळ किंमत 1,199 रुपये आहे. JioCinema प्लेटिनम प्लॅनमध्ये लाइव्ह शो वगळता सर्व कंटेंट अ‍ॅड-फ्री मिळेल. ज्यावरून अंदाज लावला जात आहे की JioCinema डेली आणि गोल्ड प्लॅन अ‍ॅड-सपोर्टेड कंटेंट देतील. तसेच यावरून स्पष्ट झालं आहे की सर्व तीन प्लॅन हाय क्वॉलिटीसह येतील.

नावही बदलणार

एका रिपोर्टनुसार JioCinema चे नाव ‘JioVoot’ होऊ शकते. परंतु कंपनीनं याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. कंपनीच्या मीडिया आणि कंटेंट बिजनेसचे अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की जियोसिनेमा आपल्या प्लॅटफॉर्मवर 100 पेक्षा जास्त चित्रपट आणि वेब सीरीज जोडण्याची योजना बनवत आहे.

जितो धन धना धन स्पर्धा

यंदा आयपीएलजी मजा वाढली आहे कारण टाटा आयपीएल 2023 जियो सिनेमावर मोफत टेलीकास्ट केली जात आहे. जिथे युजर्स मोफत आयपीएलचा लाभ घेऊ शकतात. तसेच रिलायन्स जियोनं एक नवीन ‘जितो धन धना धन’ कॉन्टेस्ट देखील सुरु केलं आहे. या कॉन्टेस्ट अंतगर्त युजर्स कारसह इतर अनेक भेटवस्तू जिंकू शकतात. ज्यात आतापर्यंत अनेक विजेत्यांना कार मिळाली आहे. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला Vivo S17 Pro, डिमेन्सिटी 7200 आणि 8जीबी रॅमसह येऊ शकतो बाजारात

जर तुम्ही ‘जीतो धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आयपीएलच्या मॅच दरम्यान तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवर पोट्रेट मोडमध्ये प्रत्येक मॅच बघावी लागेल. जिथे प्रत्येक ओव्हर नंतर एक प्रश्न विचारला जाईल. सर्व प्रश्नांसाठी चार ऑप्शन दिले जातील. ज्यात सर्वात जास्त वर्षांची उत्तरे देणाऱ्या युजरला विजेता घोषित केलं जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here