लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला Vivo S17 Pro, डिमेन्सिटी 7200 आणि 8जीबी रॅमसह येऊ शकतो बाजारात

Highlights

  • Vivo S17 सीरीज लवकरच चीनमध्ये सादर केली जाऊ शकते.
  • सीरीजमध्ये येणारा प्रो व्हेरिएंट गीकबेंच डेटावेबस वेबसाइटवर दिसला आहे.
  • गीकबेंचवर फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Vivo बद्दल बातमी येत आहे की कंपनी आपली एस17 सीरीज सादर करण्याची योजना बनवत आहे. तसेच गेले अनेक दिवस Vivo S17 Pro आणि Vivo S17 बद्दल लीक्स व माहिती समोर येत आहे. आता गीकबेंच डेटाबेस वेबसाइटवर एस17 प्रो दिसला आहे. या लिस्टिंगमधून फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे.

विवो एस17 प्रो ची सर्टिफिकेशन्सची माहिती

तुम्हाला माहित आहे की गीकबेंच एक बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म आहे. यात डिवाइसची संभाव्य कामगिरी तपासण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. आता या डेटाबेसवर विवो एस17 प्रोच्या लिस्टिंगवरून समजलं आहे की डिवाइस आधीच तयार करण्यात आला आहे आणि आता याच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत.

गीकबेंच डेटाबेसच्या स्क्रीनशॉटनुसार, Vivo S17 Pro स्मार्टफोन मॉडेल नंबर Vivo V2285A सह स्पॉट करण्यात आला आहे. डिवाइसनं सिंगल कोरमध्ये 873 आणि मल्टीकोर टेस्टमध्ये 2,350 स्कोर मिळवला आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord N30 5G चे फोटोज लाँचपूर्वीच लीक; बघा कशी असेल या फोनची डिजाईन

तसेच फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर असेल जो SoC code k6886v1_64, मॅक्स सीपीयू क्लॉक स्पीड 2.80 GHz आणि माली-G610 MC4 GPU सह येईल. फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर मिळू शकतो, अशी चर्चा सुरु आहे. तसेच लिस्टिंगमधून स्पष्ट झालं आहे की Vivo S17 मध्ये 8GB RAM आणि अँड्रॉइड 13 ओएस असेल.

विवो एस 17 प्रो चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

Vivo S17 Pro मध्ये 6.7-इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. गीकबेंच लिस्टिंग नुसार फोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 7200 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच डिवाइसमध्ये 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज मिळू शकते. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो Vivo Y36 4G; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Vivo S17 Pro मध्ये 64MP चा फ्रंट आणि 64MP चा प्रायमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा डिवाइस अँड्रॉइड 13 बेस्ड फनटचओएस 13 सह बाजारात येऊ शकतो. आशा आहे की Vivo S17 Pro मध्ये 80वॉट फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here