7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येऊ शकते जगासमोर

भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी कोरियन ऑटोमेकर किआ (Kia) 2023 ऑटो एक्सपो मध्ये 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही Kia EV9 सादर करू शकते. कंपनीनं Kia EV9 कॉन्सेप्टचा अधिकृत टीजर जारी केला आहे. Kia EV9 7-सीटर इलेक्ट्रिक SUV चं प्रोडक्शन व्हर्जन 2023 किंवा 2024 मध्ये लाँच केलं जाऊ शकतं. ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार पहिल्यांदा नोव्हेंबर 2021 मध्ये LA मोटर शो दरम्यान सादर करण्यात आली होती. इलेक्ट्रिक कार रेंजमध्ये हा ब्रँडचा फ्लॅगशिप मॉडेल असू शकतो.

Kia EV9 concept ची डिजाइन आणि फीचर्स

  • सोलर पॅनलची सुविधा
  • पॅनारॉमिक सनरूफ
  • 483km रेंज
  • 77.4kWh बॅटरी पॅक

किआ ईवी9 कॉन्सेप्ट डिजिटल ‘टाइगर फेस’ फ्रंट ग्रिलसह येतो. याच्या फ्रंटला एक नवीन एयर वेंट डिजाइन आहे. जे व्हेईकलच्या समोरील वजन कमी करतं आणि एयरोडायनॅमिक्स सुधारतं. हुड वेंट डक्ट एरियाचा वापर सोलर पॅनल म्हणून करता येतो. ही BEV ऑनरला एनर्जीचा एक पर्यायी स्रोत देते, जेव्हा ते चार्जिंग स्टेशन जवळ नसतात. किआ ईवी9 कॉन्सेप्ट फुल साइज एसयूव्ही असू शकते. हिची लांबी 5 मीटरच्या आसपास असू शकते. कॉन्सेप्टची लांबी 4,929mm, रुंदी 2,055mm आणि उंची 1,790mm आहे आणि हिचा व्हीलबेस 3,099mm आहे. जी रेंज रोव्हरपेक्षा थोडीशी छोटी आहे. हे देखील वाचा: दोन-दोन 5G सिमसह येतोय Redmi Note 12 5G; पाहा भारतातील लाँच डेट आणि किंमतही

किआ ईवी9 (Kia EV9) रिट्राक्टेबल रूफ रेल्स सह येते, जे गरज नसल्यास रूफच्या आत जातात. तसेच गरज असल्यास एक बटन प्रेस करून बाहेर काढता येऊ शकतात. इतकेच नव्हे तर यात पारंपरिक विंग मिररच्या ऐवजी कॅमेरा मॉनिटरिंग सिस्टम दिली जाऊ शकते. एसयूव्ही मध्ये ट्रायंगुलर डी-पिलर ट्रीटमेंट आहे, जी यूनिक डेलाइट ओपनिंग (DLO) सिग्नेचर बनवते. EV9 कॉन्सेप्ट मध्ये 22-इंचाचे टायर्स होते. Kia EV9 कॉन्सेप्टमध्ये मोठ्या पॅनोरमिक रूफसह 27-इंचाचा अल्ट्रा-वाइड डिस्प्ले मिळतो, ज्यात मीडिया, क्लायमेट कंट्रोल आणि कंफर्ट फंक्शनॅलिटी कंट्रोल्स देण्यात आले आहेत. एसयूव्ही पॉप-अप स्टीयरिंग पॅडसह देखील येते. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट

Kia EV9 कॉन्सेप्ट मॉड्यूलर E-GMP इलेक्ट्रिक कार आर्किटेक्चरवर आधारित आहे. या आर्किटेक्चरवर EV6, Hyundai Ioniq 5 आणि Ioniq 6 देखील येऊ शकतात. यातील EV6 मध्ये सर्वात मोठ्या लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी पॅक आहे, जो 77.4kWh चा आहे. कंपनी का दावा आहे की ही ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल चार्जवर 483 km पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज देऊ शकते. यात 350-किलोवॉट चार्जरसह पुढील जेनरेशनची अल्ट्रा-फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे, जी हिच्या अ‍ॅडव्हान्स बॅटरी इलेक्ट्रिक पावरट्रेनला 20-30 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज करू शकते. कॉन्सेप्ट EV9 मध्ये फोर- व्हील ड्राईव्ह सेटअपसाठी ड्युअल मोटर्स आहेत. कंपनीचा दावा आहे की ही 5 सेकंदांपेक्षा कमी काळात 0-100 km ताशी वेग गाठू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here