Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea, जाणून घ्या तिन्ही कंपन्यांचे 3GB प्रतिदिन डेटा असलेले बेस्ट प्लान

कोरोनाचा प्रभाव भारतात वाढत आहे. या वायरसने संपूर्ण देशाला थांबवले आहे. महामारीमुळे भारताला 21 दिवसांचा Lockdown झेलावा लागत आहे जो 14 एप्रिलला संपेल. 91मोबाईल्स आव्हान करत आहे कि तुम्ही तुमच्या घरात राहावे आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत करावी. संपूर्ण दिवस घरी राहिल्यावर इंटरनेटच्या मदतीने लोक टाईमपास करत आहेत. यामुळे टेलीकॉम नेटवर्क वर पण बोझ पडत आहे आणि स्लो इंटरनेट स्पीड सारख्या समस्या समोर ये आहेत. पण अनेक यूजर्स असे आहेत ज्यांचा इंटरनेट डेटा रात्री पर्यंत संपत आहे. पुढे आम्ही Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या अश्या बेस्ट प्लान्सची माहिती देत आहोत ज्यात तुम्ही कमी किंमतीत रोज 3GB 4G इंटरनेट डेटा वापरू शकाल.

Reliance Jio

रिलायंस जियोने आपल्या यूजर्ससाठी असा प्लान सादर केला आहे ज्यात रोज 3 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा एक प्रीपेड प्लान आहे आणि या प्लानची किंमत आहे 349 रुपये. Jio चा हा हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. सर्वात आधी डेटा बेनिफिट पाहता जियोच्या 349 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी कडून ग्राहकांना रोज 3 जीबी 4जी इंटरनेट डेटा दिला जात आहे.

प्रतिदिन 3 जीबी या हिशोबाने जियो यूजर्सना महिनाभरात एकूण 84 जीबी 4जी डेटा मिळेल. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता कंपनी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा पण देत आहे. लक्षात असू दे हे कॉल जियो टू जियो म्हणजे ऑन-नेटवर्क पूर्णपणे अमर्याद व फ्री असतील परंतु नॉन जियो नंबर वर कॉल करण्यासाठी 1000 मिनिट्स मिळतील. हे सर्व कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील. Jio यूजर फक्त 349 रुपयांचा रिचार्ज करून या प्लानचा लाभ घेऊ शकतात.

Airtel

एयरटेल बद्दल बोलायचे तर कंपनीने एक 398 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो रोज 3जीबी इंटरनेट डेटा बेनिफिट देतो. हा प्लान पण 28 दिवसांच्या वेलिडिटी सह येतो आणि रोलओवर सुविधेविना प्रतिदिन यूजरच्या नंबर वर 3जीबी 4जी डेटा क्रेडिट होतो. या प्लान मध्ये पण Airtel ग्राहकांना एकूण 84 जीबी डेटा मिळत आहे. इतर बेनिफिट्स पाहता कंपनीने अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा पण दिली आहे. विशेष म्हणजे हे कोणत्याही एफयूपी लिमिट विना मिळतात ज्यांचा वापर ऑन-नेटवर्क व ऑफ-नेटवर्क दोन्ही वर पूर्णपणे फ्री आणि अनलिमिटेड केला जाऊ शकतो. या प्लान मध्ये पण रोज 100एसएमएस ची सुविधा मिळते.

Vodafone

वोडाफोनने पण 398 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लान मध्ये यूजर्सना रोज 3जीबी 4जी इंटरनेट डेटा दिला जातो. या होशोबाने संपूर्ण प्लान मध्ये यूजर्सना एकूण 84 जीबी इंटरनेट डेटा मिळेल. Vodafone कडून पण रोज 100एसएमएस दिले जात आहेत. कॉलिंग बेनिफिट पाहता वोडाफोन यूजर या प्लान मध्ये ट्रूली अनलिमिटेड वॉयस कॉलिंगचा लाभ घेऊ शकतील.

Vodafone ने अलीकडेच आपले तीन प्लान्स अपडेट केले आहेत. हे प्लान 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांचे आहेत. या तिन्ही प्लान्स मध्ये यूजर्सना रोज 1.5जीबी 4जी डेटा मिळत होता. पण काही दिवसांसाठी वोडाफोन आपल्या यूजर्सना अतिरिक्त बेनिफिट देण्यासाठी तिन्ही प्लान्स मध्ये एक्स्ट्रा 1.5जीबी डेटा देत आहे. म्हणजे Vodafone यूजर्स एकूण 3 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. पण हि ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here