Categories: बातम्या

या देशी स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला महिलांसाठी खास फोन BeU, किंमत फक्त 6,888 रुपये

91मोबाईल्सने ऑक्टोबर मध्ये एक्सक्लूसिवली माहिती दिली होती देशी स्मार्टफोन कंपनी Lava महिलांसाठी एक खास मोबाईल Lava BeU लॉन्च करणार आहे. त्यानुसार आता कंपनीने अधिकृतपणे हा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. स्पेसिफिकेशन्स सोबतच कंपनीने फोनच्या डिजाइन मध्ये पण महिलांच्या आवडीची काळजी घेतली आहे. लावा BeU मध्ये सुरक्षेसाठी ऍप प्रीलोडेड आहेत जे संकटाच्या वेळी उपयोगी पडतील. नवीन स्मार्टफोन देशात ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही चॅनेल्सच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होईल. तसेच लावाने फिटनेस ट्रॅकिंग सुविधांसह एक स्मार्ट बॅंड आणण्याची पण योजना बनवली आहे.

महिलांसाठी खास आहे डिजाइन

या फोन मध्ये ज्याप्रकारे कलर कॉर्डिनेशन दिसते, जे महिलांना आवडणारे आहेत. लावाने महिलांसाठी खासकरून लॉन्च केलेल्या या फोन मध्ये कॅमेऱ्याच्या आसपास डायमंड कलरचा कॉम्बिनेशन दिला आहे, ज्यामुळे हा दिसायला खूप आकर्षक आहे. पिंक आणि गोल्डन कलर मध्ये या फोनचा लुक खूप क्लासी दिसतो.

हे देखील वाचा : Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च

सुरक्षेची संपूर्ण तयारी

खास डिजाइन सोबतच कंपनीने या फोन मध्ये महिलांच्या सुरक्षेची तयारी केली आहे. Lava Be U मध्ये महिलांसाठी काही खूप अत्यावश्यक सेफ्टी ऍप्स इनबिल्ट दिले आहेत. हे ऍप्स आधीपासून फोन मध्ये लोडेड आहेत. फोन मध्ये दिलेले हे ऍप कोण कोणते असतील याची माहिती देण्यात आली नाही.

स्पेसिफिकेशन्स

Lava च्या वेबसाइट वर हा फोन लिस्ट झाला आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात वॉटर-ड्रॉप नॉच 6.08-इंचाचा एचडी+ (720×1,560 पिक्सल) डिस्प्ले असेल जो 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो वर काम करेल. तसेच फोनचा डिस्प्ले 2.5D कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड असेल लावाने हा फोन 2GB RAM आणि 32GB स्टोरेज सह लॉन्च केला आहे. लावा बी यू मध्ये 1.6GHz octa core प्रोसेसर आहे जो IMG8322 GPU सह येतो.

हे देखील वाचा : 50MP कॅमेऱ्यासह येईल शक्तीशाली स्मार्टफोन OnePlus 9, लॉन्चच्या आधी जाणून घ्या वैशिष्टये

फोटोग्राफीसाठी Lava Be U मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात प्राइमरी सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण आहे. लावा बी यू मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. डिवाइस अँड्रॉइड 10 गो एडिशन वर काम करेल. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4060mAh ची बॅटरी आहे, जी गरज पडल्यास काढता येते. इतकेच नव्हे तर लावाच्या या बजेट फोन मध्ये फिंगर प्रिंट सेंसर, ब्लूटूथ 4.2, वाय-फाय सह अजून अनेक पण फीचर्स आहेत.

किंमत

हा बजेट स्मार्टफोन Lava Be U 6,888 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. कंपनीने याच्या उप्लब्धतेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. पण निश्चित आहे कि फोन ऑफलाइन आणि ऑनलाइन चॅनेलच्या माध्यमातून विकला जाईल. डिवाइस पिंक आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये सादर केला गेला आहे.

चार नवीन स्मार्टफोन घेऊन येत लावा

नवीन स्मार्टफोन सह लावा 5 जानेवारीला चार नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे, ज्याची माहिती टेक वेबसाइट गॅजेट 360 ला मिळाली आहे. सध्या लावाच्या या नवीन फोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. अपकमिंग नवीन लावा स्मार्टफोनची किंमत 5,000 रुपये आणि 15,000 रुपयांच्या आसपास असेल जे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून उपलब्ध होतील.

Published by
Siddhesh Jadhav