मात्र 6999 मध्ये लाँच झाला Lava O1, ह्यात आहे 7GB पर्यंत RAM, 5000mAh बॅटरी

Highlights

  • Lava O1 भारतीय बाजारात सादर झाला आहे.
  • ह्यात एक्सटेंटेड रॅमसह 7जीबीचा सपोर्ट आहे.
  • हा मोबाइल 7 ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध होईल.

लावानं बजेट सेगमेंट एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. डिवाइस भारतीय बाजारात Lava O1 नावानं आला आहे. विशेष म्हणजे फक्त 6,999 रुपयांच्या बजेटमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन सारखे अनेक फीचर्स आहेत. त्याचबरोबर ब्रँडच्या ऑफर अंतर्गत तुम्ही हा 6,299 रुपयांमध्ये पण विकत घेऊ शकता. चला, पाहूया ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत.

Lava O1 ची किंमत आणि उपलब्धता

  • भारतात Lava O1 सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये आला आहे.
  • फोनच्या 4GB रॅम+64GB इंटरनल स्टोरेज ऑप्शनची किंमत 6,999 रुपये आहे.
  • मोबाइलवर ब्रँड 10 टक्के सूट देत आहे. म्हणजे की तुम्ही हा फक्त 6,299 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
  • हा 7 ऑक्टोबर पासून अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान खरेदीसाठी उपलब्ध होईल.
  • तसेच फोन लाइव्हली लव्हेंडर, प्रिज्म ब्लू आणि लक्स रेड अश्या तीन कलरमध्ये विकत घेता येईल.

Lava O1 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Lava O1 फोनमध्ये युजर्सना 6.5 इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1600×720 पिक्सल रिजॉल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि वॉटर ड्रॉप नॉच डिजाइनसह सादर करण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: प्रोसेसर पाहता स्मार्टफोनमध्ये UniSoC T606 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर माली जी57 जीपीयू आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिवाइसमध्ये 4GB रॅम+64GB इंटरनल स्टोरेज मिळते. त्याचबरोबर 3GB एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट आहे. ज्याच्या मदतीनं 7जीबी पर्यंत रॅमची पावर मिळते.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा AI लेन्स आणि एलईडी फ्लॅश देखील आहे. तसेच, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: फोनला पावर देण्यासाठी 5000mAh बॅटरीचा सपोर्ट मिळतो. मोबाइलमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर आधारित आहे.
  • अन्य: मोबाइलमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतात.
  • वजन आणि डायमेंशन: Lava O1 स्मार्टफोन 163.7 × 75.3 × 9.3एमएम आणि 199.5 ग्रामचा आहे.
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here