इंडियन स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने काही दिवसांपूर्वी बाजारात Z सीरीज मध्ये आपला Lava Z71 स्मार्टफोन लॉन्च केला होता, ज्याची किंमत 6,299 रुपये होती. आता कंपनीने आपली Z सीरीज वाढवत Lava Z53 फोन लॉन्च केला आहे. चला बघूया या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती.
डिजाइन
Lava Z71 प्रमाणे Z53 कपंनीने ड्यू ड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध ‘ड्यू’ ड्रॉप नॉच आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. तसेच फोनच्या मागे डुअल कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये उजवीकडे आहे.
किंमत
Lava Z53 कंपनीने एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइस कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर लिस्ट आहे. किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने हा 4,829 रुपयांमध्ये सादर केला आहे. त्याचबरोबर फोन सोबत रिलायंस जियो यूजर्सना 1200 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक आणि 50जीबी इंस्टंट डेटा मिळेल.
स्पेसिफिकेशन्स
Lava Z53 चे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये 6.1-इंचाचा आईपीएस ड्यू ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये डुअल VoLTE सपोर्टच्या व्यतिरिक्त डेडिकेटेड गूगल असिस्टंट बटण देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये फेस अनलॉक फीचर आहे.
डिवाइस मध्ये रॅम व स्टोरेज मॉडल सह प्रोसेसरची माहिती अजून समोर आली नाही. कंपनीच्या अधिकृत साइट वर सध्या याचे स्पेसिफिकेशन्स दिसत नाहीत. पण आशा आहे कि कंपनी लवकरच फोनच्या प्रोसेसर आणि रॅम व स्टोरेजची माहिती देईल.
याव्यतिरिक्त फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4120एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी बाबत कंपनीचा दावा आहे कि हि दोन दिवस चालेल. तसेच फोन मध्ये रियर वर फोटोग्राफीसाठी 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती समोर आलेली नाही.














