8जीबी रॅम आणि 48-एमपी क्वॉड रियर कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च झाला Lenovo Z6 Pro

Lenovo ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक साथ तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Lenovo Z6 Pro, Lenovo K10 Note आणि Lenovo A6 Note स्मार्टफोन भारतात आणले आहेत. लेनोवो के10 नोट आणि लेनोवो ए6 नोट लो बजेट डिवाईस आहेत तर कंपनीने लेनोवो झेड6 प्रो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला आहे. Lenovo Z6 Pro भारतात 33,999 रुपयांमध्ये आणला आहे जो येत्या 11 सप्टेंबर पासून ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. 

Lenovo Z6 Pro लुक

Lenovo Z6 Pro कंपनीने ग्लास मेटल डिजाईन वर सादर केला आहे. हा फोन पूर्णपणे बेजल लेस आहे तसेच डिस्प्ले वर ‘यू’ शेप मध्ये छोटीशी नॉच देण्यात आली आहे. या स्क्रीनच्या खाली कंपनीने इन-डिस्प्ले फिंरगप्रिंट सेंसर पण दिला आहे जो डिस्प्लेला टच करताच फोन अनलॉक करतो. Lenovo Z6 Pro च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो फोनच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजवीकडे आहेत तर डावीकडे सिम स्लॉट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा

पावरफुल कॅमेरा
Lenovo Z6 Pro ची सर्वात मोठी ताकद याचा कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रियर कॅमेरा सेटअप मध्ये 16-मेगापिक्सलची सुपर वाइड एंगल लेंस देण्यात आली आहे जी 125डिग्री फिल्ड-आफ-व्यू देते. Lenovo Z6 Pro चा तीसरा कॅमेरा सेंसर एफ/2.4 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे तसेच चौथा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. 

Lenovo Z6 Pro स्पेसिफिकेशन्स

Lenovo Z6 Pro कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याची स्क्रीन साईज 6.39-इंच आहे. लेनोवोने झेड6 प्रो इन-डिस्प्ले फिंरगप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे जो डिस्प्लेच्या खालच्या भागात आहे. कंपनीने हा फोन 8जीबी रॅम मेमोरी सह लॉन्च केला गेला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Lenovo Z6 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित झेडयूआई 11 वर सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रोसेसिंग साठी हा फोन 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट वर चालतो. 

हे देखील वाचा: 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह या कंपनीने लॉन्च केले आपले स्मार्टफोन्स, जाणून घ्या खासियत

Lenovo Z6 Pro गेम टर्बो फीचर सह येतो जो हेवी गेम्स पण स्मूदली प्ले करतो. ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. Lenovo Z6 Pro मध्ये डुअल सिम व 4जी वोएलटीई सह पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

लेनोवो झेड6 प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here