सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 16GB रॅम असलेला स्मार्टफोन झाला लॉन्च, बदलेल का मोबाईल गेमिंगचे विश्व

लेनोवो ने आपला गेमिंग स्मार्टफोन Lenovo Legion Phone Duel सादर केला आहे. फोनच्या बाजूला पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि डुअल बॅटरी सह सर्वात ताकदवान प्रोससेर देण्यात आला आहे. लेनोवोच्या या नवीन गेमिंग फोनच्या किंमतीची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या डिवाइसची टक्कर Asus ROG Phone 3 शी होईल जो लॉन्च झाला आहे. तसेच 28 जुलैला गेमिंग सेंट्रिक फोन नूबिया रेड मैजिक 5S पण लॉन्च केला जाईल. चला जाणून घेऊया लेनोवोच्या या गेमिंग फोन बाबत सर्वकाही.

गेमिंगसाठी खास टेक्नोलॉजी

गेमिंग करताना फोन गरम होऊ नये म्हणून फोन मध्ये कॉपर ट्यूब्स सह डुअल लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये रियलिस्टिक गेमिंगसाठी 3D मोशन सेंसर, ड्यूल x-ऍक्सिस लीनियर मोटर्स सह ड्यूल अल्ट्रा-सॉनिक शोल्डर कीज देण्यात आल्या आहेत.

स्पेसिफिकेशन्स

चांगल्या गेमिंगसाठी फोन मध्ये 2340×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह 6.65 इंचाचा फुल एचडी+ AMOLED पॅनल देण्यात आला आहे. डिस्प्ले 144Hz च्या रिफ्रेश रेट आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेट सह येतो. डिवाइसचा स्क्रीन आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ Soc प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 12GB/16GB रॅम सह 256GB/512GB की स्टोरेज देण्यात आली आहे.

फोन एंडरॉयड 10 वर बेस्ड ZUI (Legion OS) वर चालतो. फोटोग्राफीसाठी हँडसेट मध्ये 64 मेगापिक्सल+16 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोन मध्ये तुम्हाला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो साइड पॉप-अप मेकनिजम सह येतो. याची खास बाबा अशी कि तुम्ही याद्वारे गेमिंग करताना पण लँडस्केप मोड मध्ये सेल्फी घेण्यासोबतच विडियो पण शूट करू शकता.

फोनला पावर देण्यसाठी यात डुअल बॅटरी सपोर्ट आहे. फोन मध्ये 2500mAh च्या दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत ज्या 90 वॉट फास्ट चार्जिंगला सपॉर्ट करतात. कंपनीचा दावा आहे कि 10 मिनिटांत फोन 50 टक्के चार्ज करता येतो. फोन फुल चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात.

किंमत आणि उपलब्धता

Lenovo Legion Phone Duel च्या किंमतीची देण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन चीन मध्ये या महिन्यांच्या शेवटी लीजन फोन प्रो म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. हा एशिया पॅसिफिक, यूरोप, मध्य पूर्व आणि अफ्रीका आणि लॅटिन अमेरिकेतील निवडक बाजारांत सादर केला जाईल. हा भारतात कधी आणि कोणत्या किंमतीत येईल याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. लेनोवोने सांगितले आहे कि लीजन फोन 12 जीबी आणि 16 जीबी रॅम वेरिएंट मध्ये येईल. तसेच फोन ब्लेजिंग ब्लू आणि लाल रंगात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here