Lenovo Z6 Pro स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. कंपनी स्वतः सोशल मीडिया वर फोनचे अनेक टीजर शेयर करत आहे. ज्यावरून समजते कि या फोन मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर असेल. आता या फोनची लॉन्च डेट समजली आहे.
लेनोवोचे वाइस प्रेसिडेंट चँग चिंग यांनी ऑफिशियली अशी घोषणा केली आहे कि Lenovo Z6 Pro स्मार्टफोन 23 एप्रिलला लॉन्च केला जाईल. हा डिवाइस चीन मधील बिजिंग मध्ये सादर केला जाईल. तसेच चँग चिंग यांनी काही दिवसांपूर्वी वीबो वर असा पण इशारा दिला होता कि हा फोन 100 मेगापिक्सलचे फोटो घेऊ शकतो. अशा आहे कि हा डिवाइस गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या Lenovo Z5 Pro चा अपग्रेड वर्जन असेल.
हे देखील वाचा: OnePlus 7 Pro बद्दल समोर आली आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती, या फीचर्स सह होईल हा दमदार फोन
अलीकडेच Lenovo ने चीनच्या सोशल मीडियाइ साइट वीबो वर घोषणा केली होती था कि झे ड6 प्रो या महिन्यात लॉन्च केला जाईल, ज्यात तारखेचा खुलासा केला गेला नव्हता. तसेच आता या फोनची ऑफिशियल लॉन्च डेट समोर आल्याने स्मार्टफोन लवर्स या फोनची वाट बघत आहेत.
विशेष म्हणजे कंपनी ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2019 मध्ये याची घोषणा केली होती कि Lenovo Z6 Pro मध्ये नवीन ‘हाइपरविजन’ कॅमेरा असेल. या कॅमेऱ्याबद्दल कंपनीचा दावा आहे कि हा हाइपर वीडियोज शूट करण्यात सक्षम असेल. कंपनीने या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असल्याचे सांगितले आहे. पण सध्या रॅम आणि स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच आता पर्यंत आलेल्या माहिती नुसार फोन मध्ये 12जीबी पर्यंतचा रॅम आणि 512 जीबी पर्यंतची स्टोरेज असू शकते.
हे देखील वाचा: 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण
तुमच्या लक्षात असेल कि Lenovo द्वारा लेनोवो झेड6 प्रो मार्च मध्ये लॉन्च केला जाणार होता. पण असे झाले नाही. आता बघावे लागेल कंपनी मागच्या प्रमाणे लॉन्च पुढे ढकलू नये. तसेच हा डिवाइस भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केल्या जाण्याबाबत कोणतीही माहिती नाही.














