Redmi 11 Prime 5G अ‍ॅमेझॉन सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध, पाहा ऑफर

Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं काही दिवसांपूर्वी भारतात Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन लाँच केला होता. हा कंपनीच्या स्वस्त 5G फोन्स पैकी एक आहे. कमी किंमत असून देखील Redmi 11 Prime 5G मध्ये 6GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 90hz रिफ्रेश रेट असे शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. असा हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल दरम्यान अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. डिस्काउंटमुळे Redmi 11 Prime 5G ची किंमत 12 हजारांच्या रेंजमध्ये आली आहे. चला जाणून घेऊया या हँडसेटवरील ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Redmi 11 Prime 5G Price

रेडमी 11 प्राइम 5जी फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची एमआरपी 15,999 रुपये आहे परंतु सेलमध्ये हा फोन 12,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तसेच जर तुम्ही हा फोन फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांची सूट मिळेल आणि हा हँडसेट फक्त 11,749 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास आणखी किंमत कमी होईल. हा फोन नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करण्याचा ऑप्शन देखील अ‍ॅमेझॉन देत आहे. हे देखील वाचा: 11 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone! बंपर डिस्काउंटसह Redmi 11 Prime 5G उपलब्ध

Redmi 11 Prime 5G Specifications

रेडमी 11 प्राइम 5जी स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. वॉटरड्रॉप नॉच असलेली ही स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे आणि 20.7:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

रेडमी 11 प्राइम 5जी फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रेडमी 11 प्राइम 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: बाहुबली स्मार्टफोन लाँच! दणकट प्रोसेसर, शानदार कॅमेऱ्यासह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री

पावर बॅकअपसाठी रेडमी 11 प्राइम 5जी मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनी आपल्या या स्मार्टफोनसह 22.5वॉट चार्जर देखील बॉक्समध्ये देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here