Redmi K70 Ultra आणि Xiaomi Mix Flip चे रॅम आणि स्टोरेज ऑप्शन आले समोर, जाणून घ्या माहिती

शाओमीचा सब ब्रँड रेडमी या महिन्यात होम मार्केट चीनमध्ये Redmi K70 Ultra लाँच करू शकते. परंतु लाँचची तारीख समोर आली नाही, मात्र कंपनी पुढच्या आठवड्यात याच्या सादर होण्याची तारीख शेअर करू शकते. तसेच, अधिकृत घोषणा होण्याच्या आधी नवीन लीकमध्ये डिव्हाईसचे स्टोरेज आणि रॅमची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर Xiaomi Mix Flip च्या व्हेरिएंट बाबत सांगण्यात आलं आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi K70 Ultra रॅम आणि स्टोरेज (लीक)

लीकनुसार मॉडेल नंबर 2407FRK8EC असलेला अगामी Xiaomi फोन चार स्टोरेज मध्ये उपलब्ध होऊ शकतो. ज्यात 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज, 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम + 1 टीबी स्टोरेज येऊ शकते. तसेच 2407FRK8EC मॉडेल नंबर Redmi K70 Ultra शी संबंधित आहे.

Redmi K70 Ultra चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे की Redmi K70 Ultra मध्ये OLED पॅनल मिळू शकतो. ज्यात 1.5K रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • चिपसेट: फोनमध्ये डेडिकेटेड X7 ग्राफिक्स चिप आणि MediaTek Dimensity 9300+ चिपसेट लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज आणि रॅम: फोनमध्ये LPDDR5x रॅम आणि UFS 4.0 इंटरनल स्टोरेज टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.
  • बॅटरी: यात 120W फास्ट चार्जिंग आणि 5,500mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता डिव्हाईसमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • इतर: Redmi K70 Ultra मध्ये मेटल फ्रेम आणि पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंग दिली जाऊ शकते.

Xiaomi Mix Flip रॅम आणि स्टोरेज (लीक)

लीकमध्ये सांगण्यात आले आहे की Xiaomi Mix Flip चा मॉडेल नंबर 2405CPX3DC आहे. हा मोबाईल 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज, 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम + 1 टीबी इंटरनल स्टोरेज सारखे चार पर्यायमध्ये येऊ शकतो.

Xiaomi Mix Flip चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • शाओमी मिक्स फ्लिप मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिप आणि जवळपास 4 इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
  • फोनच्या बॅक पॅनलवर OIS टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूम सह 60 मेगापिक्सलचा ओमनीव्हिजन OV60A टेलीफोटो कॅमेरा लावला जाऊ शकतो.
  • बॅटरी चार्जिंगच्या बाबतीत मोबाईलमध्ये 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची संभावना आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here