एलजी जी7 थिंक ची प्रेस इमेज लीक, बघा कसा आहे हा फोन

एलजी जी7 थिंक ची प्रेस इमेज लीक, बघा कसा आहे हा फोन

मार्च मध्ये सॅमसंग ने आपला फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस9 लॉन्च केला आहे. पण सॅमसंग आपला फ्लॅगशिप फोन लॉन्च करेल आणि एलजी मागे राहील असे होऊच शकत नाही आणि यावेळेस पण असे झाले नाही. कंपनी पुढच्या महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन एलजी जी7 थिंक घेऊन येत आहे. या बद्दल आम्ही आधीच माहिती दिली होती की 2 मे ला एलजी चा हा फोन लॉन्च होईल. आज या फोन बद्दल नवीन माहिती आली आहे.

लीक नुसार एलजी जी7 ​थिंक मध्ये तुम्हाला सुपर ब्राइट डिसप्ले सह एलजी ची लेटेस्ट सुपर एलसीडी टेक्निक मिळेल. कंपनी याला 6.1 इंचाच्या स्क्रीन सह सादर करू शकते आणि यात 3120 x 1440 पिक्सल रेजल्यूशन वाली क्यूएचडी+ स्क्रीन मिळू शकते.

या फोन बद्दल आधीच माहिती आली आहे की कंपनी याला नॉच स्क्रीन सह सादर करणार आहे. बातमी नुसार फोन मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली स्क्रीन असेल.

तसेच एलजी जी7 ​थिंक बद्दल आता पर्यंत जी माहिती आली आहे त्यानुसार कंपनी यात एलजी थिंक एआई फीचर देणार आहे जो गूगल असिस्टेंट वर आधारित असेल. यात गूगल असिस्टेंट साठी डेडिकेटेड बटन असेल.

माहिती नुसार या फोन मध्ये 6जीबी रॅम मेमरी असेल आणि यासोबत क्वालकॉम चा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल. त्याचबरोबर एलजी 7 थिंक आईपी68 ​सर्टिफाइड असेल ज्यामुळे हा पाणी व धूळ रोधक असेल.

कंपनी याला क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करू शकते. तसेच तुम्हाला वायरलेस चार्जिंग पण मिळेल. फोटोग्राफी साठी यात एफ/1.6 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो.

शाओमी ला नंबर एक बनवण्यासाठी काही फोन्स चे योगदान जास्त आहे. यातील एक आहे रेडमी 5ए. फक्त काही महिन्यांमध्ये कंपनी ने याचे 5 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. शाओमी चा हा फोन मागच्या वर्षी लॉन्च झाला होता पण अजूनही सेल साठी येताच लगेच आउट आॅफ स्टॉक होतो. आज शाओमी रेडमी 5ए पुन्हा एकदा सेल साठी येत आहे आणि तुमच्याकडे ही एक संधी आहे हा फोन विकत घेण्याची. पण आता हा फोन त्याच्या मूळ किंमतीत म्हणजे 5,999 रुपये आणि 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. सुरवातीला 5,999 रुपये वाल्या मॉडेल वर 1,000 रूपयांची सूट मिळत होती आणि हा फोन 4,999 रुपयांमध्ये मिळत होता. पण आता डिसकाउंट संपला आहे. रेडमी 5ए एक चांगला फोन आहे आणि हा तुम्ही विकत घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here