OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट

Highlights

  • OnePlus Ace 2 Pro लवकरच बाजारात येऊ शकतो.
  • डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते.
  • अन्य बाजारांमध्ये देखील फोन लाँच होण्याची शक्यता.

वनप्लस आपल्या Ace सीरीजचा विस्तार करू शकते. OnePlus Ace 2 Pro मॉडेल लवकरच बाजारात येऊ शकतो. कारण आता हा डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. जिथून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. सर्वप्रथम डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते. त्यानंतर अन्य बाजारांमध्ये देखील येऊ शकतो. पुढे लिस्टिंग आणि अन्य लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

OnePlus Ace 2 Pro गीकबेंच लिस्टिंग

  • वनप्लसचा नवीन डिवाइस गीकबेंच लिस्टिंगमध्ये PJA110 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • डिवाइसला सिंगल कोर मध्ये 1574 आणि मल्टीकोरमध्ये 5071 स्कोर मिळाला आहे.
  • आगामी डिवाइस 3.19 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या चिपसेटसह लाँच होऊ शकतो. म्हणजे फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असण्याची शक्यता आहे.
  • डिवाइसमध्ये प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 740 जीपीयू मिळू शकतो.
  • लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की डिवाइसमध्ये दमदार 16GB रॅम मिळू शकतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असेल.

OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : लीकनुसार फोनमध्ये 6.74 इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 1.5के रिजॉल्यूशन आणि 120hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. मोबाइल स्क्रीनवर पंच होल कटआउट डिजाइन मिळू शकते.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो. ग्राफिक्ससाठी Adreno 740 जीपीयूचा वापर केला जाईल.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह दिली जाऊ शकते. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • बॅटरी : स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात येऊ शकतो.
  • अन्य : ब्लूटूथ, वायफाय, आयआर ब्लास्टर, अलर्ट स्लाइडर, ड्युअल सिम 5G असे अनेक फीचर्स देखील ह्यात असतील.
  • OS : हा मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here