
Nokia C12 Launch: नोकियानं टेक मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आपल्या ‘सी’ सीरीजमध्ये एक नवीन मोबाइल फोन जोडला आहे. कंपनीनं नोकिया सी12 स्मार्टफोन लाँच करण्यात केला आहे. हा एक एंट्री लेव्हल डिवायस आहे जो लो बजेट सेग्मेंटमध्ये आला आहे. या फोनची किंमत 10 हजारांच्या बजेटमध्ये आहे. Android Go Edition वर सादर करण्यात आलेल्या स्वस्त मोबाइल फोन Nokia C12 ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.
Nokia C12 ची किंमत
नोकिया सी12 स्मार्टफोन कंपनीनं ग्लोबल मार्केटमध्ये सादर केला आहे. हा मोबाइल फोन 2 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Nokia C12 Price 119 Euros आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 10 हजार रुपयांच्या आसपास आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा नोकिया मोबाइल Dark Cyan, Charcoal आणि Light Mint कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. आशा आहे की नोकिया सी12 भारतात आल्यास त्याची किंमत 6,000 रुपयांच्या आसपास असेल. हे देखील वाचा: Jio नं लाँच केले रोज 2.5GB डेटा असलेले दोन प्लॅन; 90 दिवसांपर्यंतची जबरदस्त वैधता
Nokia C12 चे स्पेसिफिकेशन्स
- 6.3″ HD+ Display
- 2GB RAM + 64GB Storage
- UNISOC 9863A1 Processor
- 8MP rear + 5MP selfie
- 3,000mAh Battery
नोकिया सी12 स्मार्टफोन 20:9 अॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 2डी ग्लासनं कव्हर करण्यात आली आहे. हा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 160.6 x 74.3 x 8.75एमएम आणि वजन 177.4 ग्राम आहे.
Nokia C12 अँड्रॉइड गो एडिशनवर लाँच झाला आहे ज्यामुळे फोनमध्ये कमी रॅम असून देखील हा स्मूद चालतो. या फोनमध्ये गुगल गो अॅप्स देखील डाउनलोड व इन्स्टाल येतात, जे कमी स्टोरेज व्यापतात तसेच इंटरनेटचा वापर देखील कमी करतात. हा मोबाइल 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc SC9863A प्रोसेसर वर चालतो तसेच ग्राफिक्ससाठी आयएमजी8322 जीपीयूला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 320km रेंजसह आली Citroen eC3 EV, काही मिनिटांत होणार फुल चार्ज
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया सी12 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ड्युअल सिम, 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सारख्या फीचर्ससह पावर बॅकअपसाठी हा नोकिया फोन 3,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी बॅक पॅनल हटवून बाहेर काढता येते.

















