मोफत मिळवा 12GB डेटा; Jio युजर्ससाठी धमाकेदार ऑफर

Highlights

  • जियोनं आपल्या ग्राहकांसाठी Valentine’s Offer सादर केली आहे.
  • जियोच्या 349 रुपये आणि 899 रुपयांच्या प्लॅनचा समावेश ऑफरमध्ये करण्यात आला आहे.
  • ही ऑफर 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैध राहील.

Valentines Day 2023 निम्मिताने टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर घेऊन आल्या आहेत. अलीकडेच Vodafone idea च्या Valentine’s Offer नंतर आता Reliance Jio Valentine Day offer ची घोषणा करण्यात आली आहे. जियो आपल्या दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन (349 रुपये आणि 899 रुपये) सह एक्स्ट्रा डेटा आणि इतर बेनिफिट्स देत आहे आणि तेही अगदी मोफत. जर तुम्ही व्हॅलेन्टाईन्स डे (14 फेब्रुवारी 2023) पूर्वी तुमच्या नंबरसाठी यातील एखादा प्लॅन घेतला तर तुम्हाला टेलीकॉमसह अनेक अन्य खास बेनेफिट्स देखील मिळतील. चला जाणून घेऊया ऑफर बद्दल सविस्तर माहिती.

जियो व्हॅलेन्टाईन्स ऑफर

जियोच्या 349 रुपये आणि 899 रुपयांच्या प्लॅनसह ही व्हॅलेंटाइन ऑफर जारी करण्यात आली आहे. या व्हॅलेंटाइन ऑफर अंतगर्त ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना 12GB फ्री डेटा, McDonalds चा बर्गर, फ्लाइटवर डिस्काउंट, Ferns & Petals वरून शॉपिंग केल्यावर 150 रुपयांचे डिस्काउंट कुपन मिळत आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणार बेनिफिट्स कोणते आहेत. हे देखील वाचा: 5G Phone च्या यादीत होणार Vivo T2 5G चा समावेश; स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 सह वेबसाइटवर लिस्ट

899 रुपयांचा प्लॅन

Jio चा 899 रुपयांचा प्लॅन पाहता या रिचार्जमध्ये डेली 2.5GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 90 दिवस म्हणजे तीन महिन्याच्या आसपास आहे. त्यामुळे ग्राहक एकूण 225 जीबी डेटा या 90 दिवसांत वापरता येईल आणि ऑफर मधील 12जीबी डेटा मिळून 237 जीबी डेटा होईल. कंपनी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा देखील देत आहेत त्यामुळे ऑन व ऑफ नेटवर्क अमर्याद कॉलिंग करता येईल. रोज 100 फ्री एसएमएस देखील मिळतात. 899 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जियो सिनेमा, जियो टीव्ही, जियो सावन इत्यादी जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे. हे देखील वाचा: बजेटला धक्का न लावता खरेदी करत येईल Nokia G22; स्पेसिफिकेशन्स झाले लीक

349 रुपयांचा प्लॅन

349 रुपयांचा प्लॅनमध्ये पण डेली 2.5GB डेटा दिला जात आहे. फक्त या प्लॅनमध्ये 30 दिवसांची म्हणजे महिन्याभराच्या वैधता कंपनीनं दिली आहे. महिनाभरात 75GB डेली डेटा आणि 12GB ऑफर डेटा मिळून 87GB डेटा वापरता येईल. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगमुळे कोणत्याही नंबरवर अमर्याद बोलता येईल. 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 100 फ्री एसएमएस मिळतात. तसेच रिचार्जमध्ये जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here