शाओमीसोबत भागेदारी करून मीतू ब्रॅंडने टेक बाजारात आपले नवीन प्रोडक्ट घेऊन आला आहे. स्मार्टफोन्सच्या फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आपली पकड मजबूत करत मीतू ने आज अंर्तराष्ट्रीय बाजारात एक साथ दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मीतू ने वी7 तसेच वी7 टोनियो लॅम्बॉरगिनी लिमिटेड एडिशन सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सध्या चीनी बाजारात आले आहेत जे आपल्या लुक व डिजाईन सोबत स्पेसिफिकेशन्सच्या जोरावर इतर ब्रॅंड्सना टक्कर देत आहें.
मीतू वी7 आणि वी7 टोनियो लॅम्बॉरगिनी लिमिटेड एडिशनची सर्वात मोठी यूएसपी फोनचा ट्रिपल सेल्फी कॅमेरा सेटअप आहे. कपंनी ने या फोन मध्ये तीन सेल्फी कॅमेरा सेंसर दिले आहेत. फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा लो लाइट सेंसर, 20-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल लेंस तसेच 8-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल तसेच 8-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

मीतू वी7 तसेच वी7 टोनियो लॅम्बॉरगिनी लिमिटेड एडिशनचे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये 1,080 x 2,248 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.21-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन वर तसेच खालच्या बाजूला कोन शेप मध्ये बनला आहे. मीतू वी7 चे दोन्ही मॉडेल एंडरॉयड 9.0 पाई वर सादर केले गेले आहेत सोबत क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतात. मीतू ने आपले फोन 8जीबी च्या दमदार रॅम वर सादर केला आहे.
मीतू वी7 8जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर मीतू वी7 टोनियो लॅम्बॉरगिनी लिमिटेड एडिशन 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी तसेच 512जीबी इंटरनल स्टोरेजचा दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. 4जी एलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत मीतू वी7 चे दोन्ही मॉडेल 3,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतात. वर सांगितल्याप्रमाणे स्पेसिफिकेशन्स सोबतच मीतू वी7 ची डिजाईन पण इतर स्मार्टफोन्सपेक्षा वेगळी आहे. या फोनव्ही वरची आणि खालची बाजू ‘वी’ शेप मध्ये बनलेली आहे.
किंमत पाहता मीतू वी7 4879 युआन म्हणजे भारतीय करंसी नुसार जवळपास 48,800 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. अशाप्रकारे मीतू वी7 टोनियो लॅम्बॉरगिनी लिमिटेड एडिशनका 256जीबी स्टोरेज वेरिएंट इंडियन करंसी अनुसार जवळपास 90,400 रुपये तसेच 512जीबी मेमरी वेरिएंट जवळपास 1,10,800 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे टोनियो लॅम्बॉरगिनी लिमिटेड एडिशनच्या बॅक पॅनल वर 18 कॅरेट गोल्ड लॅम्बॉरगिनी लोगो पण आहे.














