उद्या लाँच होतेय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV; जाणून घ्या खासियत

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

TATA Tiago EV India Launch: टाटा मोटर्स 28 सप्टेंबरला आपल्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलियोमध्ये भारतातील सर्वात किफायतशीर ईव्ही (Cheapest Electric Car) सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्या लाँच होणारी TATA Tiago EV देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु या कारच्या लाँच पूर्वी हिचे काही फीचर्स समोर आलेत आहेत. ज्यात क्रूज कंट्रोल आणि वन पेडल ड्राईव्ह टेक्नॉलॉजी (One Pedal Drive) चा समावेश आहे. पुढे आम्ही या कारच्या लाँचपूर्वी टॉप 5 फीचर्सची माहिती दिली आहे ज्यामुळे ही स्वस्त इलेक्ट्रिक कार अ‍ॅडव्हान्स ईव्ही देखील बनेल.

Tata Tiago EV

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

Tata Tiago EV हॅचबॅक भारतात 28 सप्टेंबरला लाँच केली जाईल. परंतु टाटा टियागो EV सर्वप्रथम ऑटो एक्सपो 2018 मध्ये शोकेस करण्यात आली होती. तसेच ही कार 2020 पर्यंत भारतीय बाजारात लाँच होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु कंपनीनं लाँच पुढे ढकलला आणि आता उद्या या कारची भारतात एंट्री होईल. हे देखील वाचा: How To Book Confirm Train Ticket Online: अशाप्रकारे मिळवा प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये मिळवा कंफर्म तिकीट

1. Multi-level Regenerative Braking Modes

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

Tata Motors नं सांगितलं आहे की आगामी Tata Tiago EV हॅचबॅकमध्ये सिलेक्टिव्ह मल्टी-लेव्हल रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग मोड्स मिळतील जे चालता-चालता इलेक्ट्रिक हॅचबॅक बॅटरी पॅक चार्ज करेल. याचा अर्थ असा की या मोडमुळे युजर्सना जास्त रेंज मिळण्यास मदत होईल, खासकरून शहरी भागात ड्रायविंग करताना वारंवार ब्रेक मारणं खूप उपयुक्त ठरेल.

2. Sports Mode and Cruise Control

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

Tata नुसार Tiago EV मध्ये देखील क्रूज कंट्रोल आणि एक डेडिकेटेड स्पोर्ट्स मोड मिळण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्पोर्ट्स मोड निवडता येईल जो शॉर्ट बर्स्टसाठी इलेक्ट्रिक मोटरची कमाल शक्ती आणि टॉर्क पर्यंत मिळवून देईल. हा मोड जास्त आकर्षक ड्राईव्ह देण्यासाठी थ्रॉटल रिस्पॉन्स आणि स्टीयरिंग फील चांगला देतो.

3. Connected car tech

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

टाटा टियागो कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात येईल. Tata Tiago EV मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट असेल जी Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करेल. तसेच कारमध्ये अ‍ॅपच्या माध्यमातून कनेक्टेड कार फीचर्स आणि स्मार्टवॉच कम्पॅटिबिलिटी देखील असेल. टाटा मोटर्स एयर कंडीशनिंग, लाइटिंग इत्यादी फीचर्सवर रीयल-टाइम नियंत्रण देऊ शकते आणि ड्राइव्ह अ‍ॅनालिटिक्स डेटा देखील देण्यात येईल.

4. Design

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

Tata Tiago EV मध्ये हिच्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा वेगळे कॉस्मेटिक बदल दिसू शकतात. परंतु एकंदरीत लुक व डिजाइन Tata Tiago Petrol व्हर्जन प्रमाणेच असेल. आशा आहे की Tiago EV इंटेन्स स्टील पेंट शेडसह सादर केली जाईल. टाटा बाहेरील आणि आतील भागात निळा रंग आणि हाइलाइट्सचा वापर करून लुक आकर्षक बनवू शकते.

याव्यतिरिक्त टाटा मोटर्सनं सांगितलं आहे की यात सफेद रंगाच्या लेदरे सीट्सचा समावेश करण्यात येईल. तसेच यात पावर विंडो, रियर वॉश वाइप्स, फॉग लॅम्प, क्लायमेट कंट्रोल, डिजिटल MID, IRVM इत्यादींचा समावेश असेल. त्याचबरोबर Tiago आणि Tigor ICE- संचालित मॉडेल GNCAP मध्ये उच्च श्रेणीचे आहेत आणि ही देखील ABS आणि अनेक एयरबॅगसह येईल.

5. Powertrain

टाटा टियागो मध्ये जिप ट्रॉन टेक्नॉलॉजी-आधारित पावरट्रेनचा वापर केला जाऊ शकतो जी टाटा टिगोर ईव्हीमध्ये देखील वापरण्यात आली आहे. याचा अर्थ असा की Tata Tiago EV एक इलेक्ट्रिक मोटरचा वापर करेल जी कमाल 74bhp पावर आउटपुट आणि 170Nm पीक टॉर्क जेनरेट करू शकते. रिपोर्ट्सनुसार, मोटर सोबत 26kWh चा बॅटरी पॅक दिला जाईल जो Tigor EV इतकाच आहे. ही पावरट्रेन Tigor EV वर 306km ची रेंज देते. हे देखील वाचा: 42 दिवस चार्जींगविना चालेल हा फोन! फक्त 6099 रुपयांमध्ये नवीन Tecno POP 6 Pro भारतात लाँच

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

TATA Tiago Ev Price

टाटा टियागो ईव्ही टिगोर ईव्हीच्या तुलनेत एक लाख स्वस्त असू शकते. सध्या Tata Tigor EV ची किंमत 12.49 लाख रुपये ते 13.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की टियागो ईव्ही 10 लाख रुपयांच्या आसपास सादर केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here