Xiaomi ने ऑक्टोबर मध्ये भरातीय टेक मंचावर आपली नवीन ‘मी 10टी’ सीरीज सादर केली होती. कंपनीने या सीरीज अंतगर्त Xiaomi Mi 10T आणि Xiaomi Mi 10T Pro भारतात सादर केले होते. तसेच आता माहिती समोर आली आहे कि कंपनी या सीरीज मध्ये तिसरा फोन शाओमी मी 10टी लाइट पण सादर करू शकते. Xiaomi Mi 10T Lite स्मार्टफोन मॉडेल नंबर M2007J17G सह थायलंडच्या सार्टिफिकेशन NBTC वर स्पॉट केला गेला आहे. यावरून माहिती मिळाली आहे कि फोन भारतात लवकरच सादर केला जाऊ शकतो. पण अधिकृतपणे सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही.
NBTC च्या आधी Xiaomi Mi 10T Lite स्मार्टफोन ब्लूटूथ एसआईजी अथॉरिटी वर स्पॉट केला गेला होता. खास बाब अशी कि एनबीटीसी वेबसाइट वर फक्त मॉडेल नंबरच नाही तर फोनचे नाव Mi 10T Lite पण लिहिण्यात आले आहे. या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि शाओमी Mi 10T Lite लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर
Xiaomi Mi 10T Lite
फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. अँड्रॉइड 10 आधारित मीयूआई 12 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 750G चिपसेट वर रन करतो.
Xiaomi Mi 10T Lite क्वाड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,820एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहेत.
हे देखील वाचा : iPhone 12 Mini प्रमाणे Xiaomi घेऊन येऊ शकते Redmi Mini, जाणून घ्या खासियत
शाओमी मी 10टी लाइट यूरोप मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे त्याची किंमत EUR 279 म्हणजे जवळपास 24,000 रुपये आहे. तर दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत EUR 329 म्हणजे जवळपास 28,300 रुपये आहे. आशा आहे कि भारतात पण हा फोन याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल.















