जवळपास दोन आठवड्यांपूर्वी लीक समोर आला होता ज्यात सांगितले होते की माइक्रोमॅक्स चा पहिला एंडरॉयड गो स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे. त्यानुसार आज इंडियन टेक कंपनी माइक्रोमॅक्स ने आपला हा शानदार डिवाईस जगासमोर आणला आहे. माइक्रोमॅक्स ने भारत गो स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे. माइक्रोमॅक्स ने आपल्या या स्मार्टफोन ला टेलीकॉम कंपनी एयरटेल सोबत मिळून बाजारात आणले आहे, जो फक्त 2,399 च्या इफेक्टिव प्राइस वर विकत घेता येईल.
माइक्रोमॅक्स भारत गो एंडरॉयड ओरियो (गो एडिशन) वर चालतो जो खुप कमी स्पेसिफिकेशन्स असूनही फोन ची प्रोसेसिंग स्मूथ, फास्ट व लॅग फ्री ठेवतो. माइक्रोमॅक्स भारत गो ची खरी किंमत 4,399 रुपये आहे, पण एयरटेल नंबर सह हा फोन विकत घेतल्यास कंपनी 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. हा कॅशबॅक मेरा पहला स्मार्टफोन मोहिमे अंतर्गत मिळेल. या फोन ची सर्वात मोठी खासियत याचे एंडरॉयड गो वर्जन असेल.
भारत गो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये 4.5-इंचाचा एफडब्ल्यूवीजीए एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम मेमरी सह 8जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच हा फोन क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक चिपसेट वर चालतो. फोन च्या डाव्या पॅनल ‘स्मार्ट की’ देण्यात आली आहे ज्यात एडवांस एक्सेस फीचर्स आहेत. ट्वीट नुसार या फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सह 2,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
माइक्रोमॅक्स भारत गो एक डुअल सिम फोन आहे जो वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये जीमेल गो, गूगल मॅप्स गो, फाइल्स गो, गूगल क्रोम, यूट्यब गो, गूगल असीस्टेंट गो, प्ले स्टोर व जीबोर्ड सारखे टूल्स प्रीलोडेड आहेत. गूगल अॅप्स चे हे गो वर्जन एकीकडे इंटरनेट कमी वापरतात तर दुसरीकडे फोन ची प्रोसेसिंग पण फास्ट ठेवतात. माइक्रोमैक्स गो एयरटेल नेटवर्क वर 2,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर बाजारात हा फोन फक्त 4,399 रुपयांच्या किंमतीत सेल साठी उपलब्ध झाला आहे.