Motorola Edge 50 Pro स्मार्टफोनच्या भारतात लाँच झाल्यानंतर आता कंपनी या सीरिजचे इतर मोबाईल पण बाजारात आणण्याची तयारी करत आहे. हे फोन Edge 50 Fusion तसेच Edge 50 Ultra नावाने लाँच केले जाऊ शकतात. यामध्ये एक मोटोरोला ऐज 50 प्रो बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर पण लिस्ट झाला आहे जिथे मोबाईलच्या नावसह याची अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे.
Motorola Edge 50 Ultra गीकबेंच लिस्टिंग
- मोटोरोला ऐज 50 अल्ट्रा 9 एप्रिल, 2024 ला चीनी बेंचमार्किंग साईटवर सर्टिफाइड झाला आहे.
- हा मोबाईल फोन Motorola Edge 50 Ultra नावाने लिस्ट करण्यात आला आहे.
- लिस्टिंगमध्ये समोर आले आहे की ऐज 50 अल्ट्रा Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह असणार आहे.
- फोनमध्ये octa-core प्रोसेसर दिला जाईल ज्यात 1 3.01GHz, 4 2.80GHz तसेच 3 2.02GHz कोर सामिल असणार आहे.
- ग्राफिक्ससाठी Edge 50 Ultra स्मार्टफोनमध्ये Adreno 735 GPU दिला जाणार असल्याची गोष्ट लिस्टिंगमध्ये समोर आली आहे.
- गीकबेंचवर मोटोरोला ऐज 50 अल्ट्रा 5 जी फोन 12GB RAM सह सर्टिफाईड झाला आहे.
- लिस्टिंगमध्ये फोनला Android 14 OS सह सांगण्यात आले आहे जो माययूएक्स सह काम करेल.
- बेंचमार्क स्कोर पाहता अपकमिंग मोटोरोला फोनला 947 single-core तथा 5149 multi-core स्कोर मिळाला आहे.
Motorola Edge 50 Pro किंमत
- 8GB RAM + 256GB Storage = ₹31,999
- 12GB RAM + 256GB Storage = ₹35,999
मोटोरोला ऐज 50 प्रो 5जी फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे ज्याची किंमत 31,999 रुपये आहे. त्याचबरोबर 68W charger मिळेल. तसेच फोनला 12 जीबी रॅम व्हेरिएंट 125W charger सह दिले जात आहे ज्याची किंमत 35,999 रुपये आहे. हा फोन Black Beauty, Luxe Lavender आणि Moonlight Pearl कलरमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.
Motorola Edge 50 Pro स्पेसिफिकेशन
डिस्प्ले : मोटोरोला ऐज 50 प्रो मध्ये 6.7 इंचाचा 1.5k 3 डी कर्व pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर युजर्सना 144Hz रिफ्रेश रेट, 2000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, HDR10+ आणि 100 टक्के DCI-P3 कलर गमट टेक्नॉलॉजी देण्यात आले आहे. तसेच डिव्हाईसमध्ये डोळ्यांच्या सुरक्षेसाठी SGS टेक्नॉलॉजी आहे. ज्याच्या मदतीने ब्लू लाईट एमिशनपासून बचाव होत आहे.
प्रोसेसर : Motorola Edge 50 Pro 5G फोनला ब्रँड पॉवरफुल Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह घेऊन येत आहे. हा चिपसेट 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर चालतो. यात युजर्सना जबरदस्त 2.63GHz पर्यंतच्या हाई क्लॉक स्पीडची मजा मिळते. त्याचबरोबर AI चा उपयोग पण करण्यात आला आहे.
कॅमेरा : मोटोरोला ऐज 50 प्रो ला खास बनवितो, कारण आहे याचा कॅमेरा यात ब्रँडने शानदार लेन्सचा वापर केला आहे. डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा आहे. ज्यात OIS टेक्नॉलॉजी असलेला f/1.9 अपर्चरसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 13MP चा अल्ट्रा वाइड+मॅक्रो लेन्स आणि 10MP चा टेलीफोटो लेन्स मिळतो. तसेच, सेल्फी आणि रिल बनविण्यासाठी युजर्ससाठी खास 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी : फोनमध्ये युजर्सना दमदार 4500mAh ची बॅटरी दिली जात आहे. याला फास्ट चार्ज करण्यासाठी ब्रँडने 125W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. तसेच फोनमध्ये 50 वॉट टर्बो पावर वायरलेस चार्जिंगची पावर पण आहे. दोन्ही मोडमुळे स्मार्टफोन मिनटांमध्ये फुल चार्ज होतो. तसेच कोणत्याही इतर फोनला चार्ज करण्यासाठी 10 वॉट वायरलेस पावर शेअरिंग पण आहे.