देशी मोबाईल कंपनी Micromax ने अलीकडेच भारतीय बाजारात आपली नवीन सुरवात करत Micromax In 1b स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 2 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅमचा समावेश आहे. माइक्रोमॅक्स इन 1बी सध्या देशात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही पण फोनची विक्री सुरु होण्याआधी माहिती समोर येत आहे कि Micromax In 1b चा 4 जीबी रॅम मॉडेल अँड्रॉइड 10 ओएस वर रन करेल तसेच फोनचा 2 जीबी रॅम मॉडेल Android 10 (Go edition) सह उपलब्ध होईल.
Micromax In 1b स्मार्टफोन संबंधित हि मोठी माहिती गॅजेट360 वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइट रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि माइक्रोमॅक्स इन 1बी स्मार्टफोनचे दोन्ही मॉडेल वेगवेगळ्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर चालतील. फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट तर अँड्रॉइड 10 च्या रेग्युलर एडिशन वर चालेल पण Micromax In 1b चा 2 जीबी रॅम वेरिएंट कंपनी अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन सह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करेल. माइक्रोमॅक्स स्मार्टफोनचे हे दोन्ही मॉडेल्स एकाच चिपसेटला सपोर्ट करतील.
माइक्रोमॅक्स इन 1बी का 2 जीबी रॅम वेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंट मध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. किंमत पाहता 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. हा फोन येत्या काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Micromax In 1b
फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.52-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे ज्यात HD+ एलसीडी डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. फोनचा स्क्रीन आस्पेक्ट रेशिया 20:9 आहे आणि हा वॉटरड्रॉप नॉच सह येतो. फोनचे स्क्रीन रेज्यूल्यूशन 720 x 1600 pixels आहे आणि पिक्सल डेंसिटी 269 ppi.
हे देखील वाचा : Micromax In 1b Vs Redmi 9A: जाणून घ्या कोण जिंकेल लो बजेटची लढाई
फोटोग्राफीसाठी हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. कॅमेरा 3x डिजिटल झूम सपोर्ट सह सादर केला गेला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Micromax In 1b मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये 2.3 GHz Octa core प्रोसेसर दिला आहे जो 64 bit Cortex A53 आर्किटेक्चर वर चालतो. ग्राफिक्ससाठी PowerVR GE8320 जीपीयू देण्यात आला आहे. मीडसेग्मेंट मध्ये हा प्रोसेसर चांगल्या गेमिंग परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
माइक्रोमॅक्स इन 1बी व्हिडीओ