मोटोरोला कडून अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केल्या गेलेल्या स्मार्टफोन मोटो ई5 प्लस बद्दल मोटोरोला इंडिया ने ट्वीट केले आहे की कंपनी लवकरच आपला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणेल. आज कंपनी ने या स्मार्टफोन च्या लॉन्च डेट चा खुलासा केला आहे. मोटोरोला इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवून सांगितले आहे की मोटो ई5 प्लस येत्या 10 जुलै ला भारतात लॉन्च केला जाईल.
मोटोरोला इंडिया ने मोटो ई5 प्लस च्या इंडिया लॉन्च ची माहिती देण्यासाठी मीडिया इन्वाईट पाठवले आहेत. मोटो चा शानदार स्मार्टफोन येत्या 10 जुलै ला भारतात लॉन्च करण्यात येईल. लॉन्च डेट सोबत मोटोरोला इंडिया ने असे पण सांगितले आहे की हा स्मार्टफोन अमेजॉन एक्सक्लूसिव असेल आणि त्याचबरोबर कंपनी हा स्मार्टफोन मोटो हब वरून पण विकेल.
मोटो ई5 पाहता ब्राजील मध्ये हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.7-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. हा फोन स्टॉक एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी साठी मोटो ई5 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन एलईडी फ्लॅश सपोर्ट वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वरील मोटो लोगो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमेजॉन इंडिया ने पण मोटो ई5 आपल्या वेबसाइट वर लिस्ट केला होता. तिथे मोटो ई5 फ्लॅश ग्रे कलर वेरिएंट मध्ये लिस्ट झाला होता आणि याची किंमत 10,700 च्या आसपास सांगण्यात आली होती. पण हा फोन कोणत्या तारखेला भारतात लॉन्च केला जाईल आणि देशात याची किंमत काय असेल यासाठी कंपनी च्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.















