19 जूनला लॉन्च होत आहे भविष्याचा फ्लॅगशिप फोन ‘फाइंड एक्स’, हा बदलेल स्मार्टफोन ची दुनिया

ओपो ने काही आठवड्यांपूर्वी भारता सह इतर देशांमधील सोशल मीडिया अकाउंट्स वरून माहिती दिली होती कि कंपनी लवकरच आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘फाइंड एक्स’ टेक जगासमोर आणणार आहे. ओपो ने फाइंड एक्स चा पहिला टीजर शाओमी मी 8 एक्सप्लोरर एडिशन च्या लॉन्च नंतर लगेचच सादर केला होता. तसेच आता ओपो ने या फोन ची लॉन्च डेट सांगितली आहे. ओपो ने सार्वजनिक केले आहे की फाइंड एक्स स्मार्टफोन येणार्‍या 19 जूनला टेक जगासमोर येईल.

ओपो फाइंड एक्स ची लॉन्च डिटेल शेयर करत सांगितले की कंपनी येणार्‍या 19 जूनला पॅरिस मध्ये एका अंर्तराष्ट्रीय ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून ओपो फाइंड एक्स पहिल्यांदा टेक जगात येईल. पण ओपो ने फाइंड एक्स चे फीचर किंवा स्पेसिफिकेशन्स संबंधी माहिती दिली नाही परंतु फाइंड एक्स समोर आल्यावर हा फोन फ्लॅगशिप डिवाईस ची नवीन लीग सुरू करेल.

ओपो फाइंड एक्स ची पोस्ट करताना ओपो ने याला भविष्याचा फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून संबोधले आहे. शाओमी मी 8 एक्सप्लोरर एडिशन लॉन्च झाल्यानंतर ओपो फाइंड एक्स चे समोर येणे या गोष्टी कडे इशारा करत आहे की ओपो आपला हा फोन शाओमी च्या लेटेस्ट स्मार्टफोन ला टक्कर देण्यासाठी सादर करत आहे. विशेष म्हणजे मी 8 एक्सप्लोरर एडिशन प्रमाणे फाइंड एक्स मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल आणि अॅप्पल आयफोन 10 प्रमाणे या फोन मध्ये 3डी फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक मिळेल.

फाइंड एक्स बद्दल इतर माहिती समोर आली नाही पण बोलले जात आहे की हा स्मार्टफोन पण नॉच डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 8जीबी रॅम दिला जाऊ शकतो त्याचबरोबर हा पावरफुल चिपसेट वर चालेल. ओपो फाइंड एक्स मध्ये 5एक्स झूम वाला कॅमेरा, 15 मिनिटांत चार्ज होणारी सुपर फास्ट फ्लॅश चार्ज टेक्निक आणि 5जी कनेक्टिविटी सारखे अत्याधुनिक व एडवांस आॅप्शन्स मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here