Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह लाँच झाला Moto G stylus 5G (2023), जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • moto g stylus (2023) मध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे.
  • फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 SoC देण्यात आला आहे.
  • मोबाइलमध्ये 20 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी आहे.

मोटोरोलानं आपल्या तिसऱ्या पिढीच्या Moto G Stylus 5G ची घोषणा अमेरिकेत केली आहे. तसेच, ह्या डिवाइसची खास बाब म्हणजे हा क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेटसह लाँच होणारा पहिल्या हँडसेट पैकी एक आहे. कंपनीनं चार्जिंग पोर्टच्या बाजूला स्टायलस ठेवला आहे जो काहीसा सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रामध्ये मिळणाऱ्या एस पेन सारखा आहे. पुढे तुम्हाला लाँच झालेल्या नवीन Moto फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

Moto G stylus 5G (2023) किंमत आणि सेल डिटेल

प्राइस : Moto G stylus 5G (2023) कॉस्मिक ब्लॅक आणि रोज शॅम्पेन कलरमध्ये आला आहे. ह्या फोनची किंमत $399.99 (जवळपास 33,070 रुपये) पासून सुरु होते.

उपलब्धता : नवीन moto g stylus 5G 16 जून पासून Amazon.com, Best Buy आणि Motorola.com वर यूनिवर्सल पद्दतीन अनलॉक देखील उपलब्ध होईल.

मोटो जी स्टाइलस 5जी (2023) स्पेसिफिकेशन

डिस्प्ले : ह्यात 6.6-इंचाची FHD+ (1080×2400 पिक्सल) LCD स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आली आहे

प्रोसेसर : हँडसेटमध्ये ऑक्‍टा कोर स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 4nm मोबाइल प्‍लेटफॉर्म (2.2 GHz x 4 A78-आधारित +1.8GHz x 4 A55-आधारित Kryo CPUs) Adreno GPU सह येतो.

रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 128GB / 256GB स्टोरेजसह 4GB / 6GB LPDDR4X रॅम, मायक्रोएसडीसह 2TB पर्यंत एक्सपांडेबल मेमरी आहे.

कॅमेरा : फोनमध्ये मागे f/1.88 अपर्चरसह 50MP चा रियर कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, मॅक्रो + डेप्थ फंक्शन, LED फ्लॅश आहे. तर, सेल्फीसाठी f/2.45 अपर्चरसह 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

ओएस आणि कनेक्टिव्हिटी ऑप्शन : हँडसेट My UX सह Android 13 वर चालतो. तसेच ह्यात माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडियो जॅक, स्टीरियो स्पिकर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस आहे.

साइज : फोनची साइज 162.83x 73.77 x 9.19 मिमी आणि वजन 202 ग्राम आहे.

4G व्हर्जन आधी आला आहे

कंपनीनं ह्या महिन्याच्या सुरुवातीला Moto G Stylus (2023) चा 4जी व्हर्जन सादर केला होता. ह्या हँडसेट मध्ये 6.5 इंचाचा IPS डिस्प्ले, ऑक्टा कोर MediaTek Helio G85 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे.

तसेच Moto G Stylus मध्ये 50MP चा पहिला कॅमेरा आणि 2MP चा दुसरा कॅमेरा आहे. तसेच फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरबर ह्यात 5,000mAh ची बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here