काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Realme लवकरच भारतात Realme Race नावाची प्रीमियम स्मार्टफोन सीरीज लॉन्च करणार आहे, जी लुक आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत खूप शानदार असेल. अलीकडेच सीरीज मध्ये येणाऱ्या Realme Race Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली होती. तर आता, टेक वेबसाइट MySmartPrice ने Realme Race चे रेंडर्स चायनीज सर्टिफिकेशन साइट टेनावर बघितले आहेत. या रेंडर्सवरून फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे.

डिजाइन

Realme Race सर्टफिकेशन साइटवर मॉडेल नंबर RMX2202 सह स्पॉट केला गेला आहे. फोटोजनुसार रियलमी रेस मध्ये आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात तीन सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश दिला जाईल. रियर पॅनल दिसायला ग्लोसी फिनिश असल्यासारखा वाटत आहे जो ग्लास पण असू शकतो. तसेच रियलमीच्या या फ्लॅगशिप फोनच्या फ्रंटला लेफ्ट कॉर्नरवर होल-पंच कटआउट दिसत आहे. त्याचबरोबर डिवाइसच्या उजवीकडे पावर बटन आणि वॉल्यूम बटन डावीकडे आहे. टेनावर समोर आलेल्या फोटोज मध्ये डिवाइसवर कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिसला नाही. त्यामुळे बोलले जात आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले सेंसर आणि ऐमोलेड डिस्प्ले असेल.

हे देखील वाचा : Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत

स्पेसिफिकेशन्स

Realme रेसचे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी TENAA वेबसाइटवर समोर आले नाहीत. पण, दिवसांपूर्वी टिपस्टर आइस यूनिवर्सने माहिती दिली होती कि स्मार्टफोन 12GB LPDDR5 रॅमसह फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेटवर सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 5,000mAh च्या बॅटरी सोबत 125W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. Realme रेस मध्ये 64MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम असण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Realme ने केली कमाल, लॉन्च केला 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन, यात आहे 4GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी

Realme Race Pro चे स्पेसिफिकेशन्स

अलीकडेच या सीरीजच्या अपकमिंग फ्लॅगशिप मोबाईल Realme Race Pro ची माहिती पण समोर आली होती. सांगण्यात आले होते कि फोन मध्ये 6.8 इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1440×3200 पिक्सल असेल. त्याचबरोबर फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 160Hz असू शकतो. इतकेच नव्हे तर या फोन मध्ये पण Qualcomm Snapdragon 888 SoC प्रोसेसरसह 12GB रॅम असल्याची माहिती समोर आली होती. या रॅमसह फोन मध्ये 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचा ऑप्शन दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here