भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी

5G ची सुरवात तर गेल्या वर्षीच झाली होती पण साल 2021 5जीच्या क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. भारतात 5जी नेटवर्क सुरु नाही झाले पण मोबाईल ब्रँड्सनी या सर्विससाठी आधीपासूनच कंबर कसली असल्याचे दिसत आहे. अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपले 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. इंडियन युजरच्या गरजा जाणून या मोबाईल कंपन्या असा प्रयत्न करत आहेत कि कमीत कमी किंमतीत 5जी कनेक्टिविटी असलेले मोबाईल फोन घेऊन यावे. आज भारतीय बाजारात अनेक 5जी स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे मिडबजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची यादी बनवली आहे हे आकर्षक लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह पण येतात. या 5G Phone ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.

Realme X7 5G

रियलमी एक्स7 5जी भारतीय बाजारात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 19,999 रुपये आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा फोन 21,999 रुपयांमध्ये 12 फेब्रुवारीपासून विकत घेता येईल.

Realme X7 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.4 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल एमोलेड डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. रियलमी एक्स7 अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च झाला आहे जो रियलमी युआय सह चालतो. प्रोसेसिंगसाठी रियलमी एक्स7 मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे त्याचबरोबर माली-जी57 जीपीयू आहे.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत

हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme X7 मध्ये 4,310एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजी सह येते.

Xiaomi Mi 10i 5G

शाओमीने साल 2021 ची सुरुवात मी 10आय सोबतच केली आहे. भारतात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजवर लॉन्च झाला ज्याची किंमत 23,999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Atlantic blue आणि Pacific Sunrise कलर मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Mi 10i 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च केला आहे जो 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येते. मी 10आय 5जी कंपनीने अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला आहे जो मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये र्कोटेक्स ए-77 सीपीयूवर काम करणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी कनेक्टिविटीसह येतो.

हे देखील वाचा : Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत

xiaomi mi 10i

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10i 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा HM2 sensor देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा शाओमी फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,820एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G 5G

मोटोरोलाचा हा 5जी फोन भारतात 6 जीबी रॅमसह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. नोव्हेंबर 2020 मध्ये मार्केट मध्ये आलेल्या या फोनची किंमत फक्त 20,999 रुपये आहे. जो Volcanic Grey आणि Frosted Silver कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. मोटो जी 5जी आईपी52 रेटिंग सह बाजारात आला आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो.

Moto G 5G स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो एचडीआर 10ला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750 5जी चिपसेटवर चालतो. हा चिपसेट फोनला डुअल मोड 5G (SA/NSA) कनेक्टिविटी देतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Motorola पण घेऊन येत आहे स्वस्त 5G फोन, 6 जीबी रॅमसह झाला वेबसाइटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 20वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Vivo V20 Pro 5G

वीवो वी20 प्रो 5जी डिसेंबर मध्ये भारतात लॉन्च झाला होता जो 8 जीबी रॅमसह मार्केट मध्ये आला होता. फोन मध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी आहे तसेच या फोनची किंमत 29,990 रुपये आहे. मार्केट मध्ये हा फोन Midnight Jazz आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 6.44 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वीवो वी20 प्रोची स्क्रीन 408पीपीई आणि 3000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते.

Vivo V20 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी वीवो वी20 प्रो एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 4,000एमएएच बॅटरीवर लॉन्च केला गेला आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

वीवो वी20 प्रोच्या बॅक पॅनलवर तीन तर फ्रंट पॅनलवर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो त्यासोबत एफ/2.28 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तर मागे एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे.

OnePlus Nord 5G

गेल्यावर्षी लॉन्च झालेला वनप्लस नॉर्ड आजपण देशातील सर्वात स्वस्त आणि बेस्ट 5जी स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे यातील सर्वात छोटा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 24,999 रुपयांमध्ये, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये आणि सर्वात मोठा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord 5G स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 6.44-इंचाच्या फ्लूयड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित आक्सिजनओएसवर लॉन्च झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लाक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी वर चालतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 30टी वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,115एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये चार रियर आणि दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सल Sony IMX586 सेंसर, एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.24 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 सेंसर आणि एफ/2.45 सह 8 मेगापिक्सलच्या सेंसरला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here