Moto G8 आणि Moto G8 Power होतील लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर

Motorola ने गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये आपल्या ‘मोटो जी सीरीज’ अंतर्गत Moto G8 Plus आणि Moto G8 Play स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर यूजर सीरीजच्या बेस वर्जन तसेच पावर वर्जनची वाट बघत आहेत. आज एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि मोटोरोलाने Moto G8 आणि Moto G8 Power वर काम सुरु केले आहे आणि लवकरच दोन्ही स्मार्टफोन टेक मंचावर येतील. एक्सडीए डेवलेपर्सने आपल्या रिपोर्ट मध्ये फोनच्या डिजाईन सोबत यांचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर केले आहेत ज्यावरून समजते कि मोटोरोलाचे हे आगामी स्मार्टफोन किती शानदार असतील.

अशी असेल डिजाईन

Moto G8 आणि Moto G8 Power बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हे दोन्ही स्मार्टफोन पंच होल डिस्प्ले सह येतील तसेच राउंड कॉर्नर डिजाईन सह येतील. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले मिळेल. मोटो जी8 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तर मोटो जी8 पावर मध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळू शकतो. दोन्ही फोन्सचा रियर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर Moto चा लोगो असेल जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल.

Moto G8

मोटो जी8 बद्दल बोलायचे तर रिपोर्टनुसार हा फोन 1560 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार Moto G8 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 2 जीबी रॅम, 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये 32 जीबी मेमरी आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

Moto G8 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रिपोर्टनुसार Moto G8 च्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस मिळू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,000एमएएच ची बॅैटरी दिली जाऊ शकते.

Moto G8 Power

मोटो जी8 पावर 2300 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.36 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. रिपोर्टनुसार Moto G8 Power मध्ये 5,000 ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी8 पावर मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

रिपोर्टनुसार Moto G8 Power च्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

असे असले तरी Moto G8 to G8 आणि Moto G8 Power च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि याच्या लॉन्चच्या माहितीसाठी Motorola च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here