महिनाभराची वैधता आणि 60GB डेटा; Airtel ने लाँच केले दोन नवीन Monthly Plan

Highlights

  • Airtel Rs 489 आणि Rs 509 दोन नवीन मंथली रिचार्ज प्लॅन आहेत.
  • दोन्ही प्लॅनमध्ये डेटासह अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.
  • Rs 489 आणि Rs 509 ची वैधता अनुक्रमे 30 दिवस व एक महिना आहे.

Bharti Airtel नं आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी दोन नव्या प्लॅन्सची (Airtel launches 2 new prepaid plans) घोषणा केली आहे. या प्लॅन्सची खासियत म्हणजे यात 28 दिवसांची अपूर्ण वैधता मिळत नाही तर हे प्लॅन्स महिनाभर चालतात. त्यामुळे ज्या युजर्सना वर्षाला 13 वेळा रिचार्ज करायला आवडत नाही त्यांच्यासाठी हे योग्य प्लॅन्स ठरू शकतात. एयरटेलनं 489 रुपये आणि 509 रुपये असे दोन प्लॅन मंथली व्हॅलिडिटीसह सादर केले आहेत. यात रिचार्ज प्लॅनमध्ये वैधता व्यतिरिक्त हायस्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री SMS चे फायदे मिळतात. चला जाणून घेऊया या प्लॅन्सबद्दल सविस्तर.

Airtel new prepaid plans

एयरटेलनं 489 रुपये आणि 509 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला आहे. दोन्ही रिचार्जमध्ये मिळणाऱ्या डेटावर कोणतीही डेली लिमिट नाही. त्यामुळे तुम्ही एकाच दिवसात संपूर्ण डेटा संपवू शकता किंवा महिनाभर डेटा सांभाळून वापरू शकता. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि व्यतिरिक्त मिळणाऱ्या इतर बेनिफिट्सची माहिती. हे देखील वाचा: मोटोरोलाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच; असे आहेत Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स

Airtel Rs 489 prepaid plan: या प्री-पेड प्लॅनमध्ये युजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ दिला जात आहे. तसेच, रिचार्जमध्ये 300 SMS आणि 50GB डेटा मिळत आहे. या डेटावर कोणतीही डेली लिमिट नाही. तसेच या प्लॅनची वैधता 30 दिवस आहे. अ‍ॅडिशनल बेनिफिट्स पाहता या रिचार्जमध्ये Wynk Music चा अ‍ॅक्सेस मोफत दिला जात आहे. तसेच फ्री हॅलो ट्यून, Apollo 24/7 Circle आणि FASTag रिचार्जवर कॅशबॅकचा फायदा देखील ग्राहक या रिचार्जमधून घेऊ शकतील. हे देखील वाचा: OPPO Reno 8T च्या लाँचची तारीख ठरली; शानदार कॅमेरा असल्याचा कंपनीचा दावा

Airtel Rs 509 prepaid plan: Airtel नं हा नवीन मंथली रिचार्ज प्लॅन देखील प्रीपेड ग्राहकांच्या सेवेत दाखल केला आहे, ज्यात तुम्हाला पूर्ण महिनाभराची वैधता मिळते. म्हणजे 28 किंवा 30 दिवस नव्हे तर हा प्लॅन 31 दिवस देखील चालेल. जितक्या दिवसांचा महिना असेल तितके दिवस हा प्लॅन वैध असेल, यामुळे वर्षातून 13 रिचार्ज करण्याची गरज नाही आणि तुमची रिचार्जची तारीख प्रत्येक महिन्यात एकच राहते. रिचार्जसह लोकल-एसटीडी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फ्री मिळेल. त्याचबरोबर प्लॅनमध्ये 300 SMS आणि 60GB हाय-स्पीड डेटासह Wynk Music चा अ‍ॅक्सेस फ्री दिला जात आहे. इतकेच नव्हेतर प्लॅनमध्ये फ्री हॅलो ट्यून, Apollo 24/7 Circle आणि FASTag रिचार्जवर कॅशबॅक देखील ऑफर केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here