6GB RAM आणि MediaTek Dimensity 700 सह Vivo Y55s 5G तैवानमध्ये लाँच

Highlights

  • Vivo Y55s 5G सध्या तैवानमध्ये लाँच झाला आहे.
  • हा विवो फोन SA/NSA 11 5G Bands ला सपोर्ट करतो.
  • विवो वाय55एस Memory Consolidation 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो.

विवोनं आपल्या ‘वाय’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Vivo Y55s 5G सादर केला आहे. हा विवो मोबाइल सध्या तैवानमध्ये आला आहे जो 6GB RAM, MediaTek Dimensity 700 SoC, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. विवो वाय55एस एक मिड बजेट 5जी फोन आहे ज्यात आर्कषक लुक व पावरफुल स्पेसिफिकेशन्स मिळतात.

Vivo Y55s 5G Price

विवो वाय55एस 5जी फोन तैवानमध्ये दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत NTD 7,990 म्हणजे 21,000 रुपयांच्या आसपास आहे. तर मोठा Vivo Y55s 5G 6 GB RAM + 128 GB storageला सपोर्ट करतो आणि याची प्राइस NTD 8,490 आहे जी भारतीय करंसीनुसार जवळपास 22,700 रुपये आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा 5जी विवो फोन Galaxy Blue आणि Star Black कलरमध्ये लाँच झाला आहे. हे देखील वाचा: बाजारावरील पकड मजबूत करण्यासाठी सॅमसंगची नवी योजना; Samsung Galaxy A24 लाँचसाठी सज्ज

Vivo Y55s 5G Specifications

  • 6.58″ FHD+ Display
  • 6 GB RAM + 128 GB storage
  • MediaTek Dimensity 700 SoC
  • 50MP Dual Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery

विवो वाय55एस 5जी फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. या फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.6% टक्के आहे ज्यात अल्ट्रा वाइड कलर गामुट आणि 96% एनटीएससी मिळतो.

Vivo Y55s 5G फोन अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. वाय55एस 5जी फोन एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो, त्यामुळे इंटरनल रॅम 2जीबी एक्स्ट्रा वाढवता येतो. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी विवो वाय55एस 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर वाले 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Mahindra ची TATA ला भीती! XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत, रेंजही वाढवली

Vivo Y55s 5G ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा विवो फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचची मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here