12 नव्हे 13 महिने चालेल BSNL चा ‘हा’ प्लॅन; एयरटेल-जियोपेक्षा कमी किंमत आणि रोज 2GB डेटा

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) अशी कंपनी आहे जी कमी किंमतीत शानदार बेनिफिट्स असलेले प्लॅन्स सादर करत असते. इतर कंपन्या 28 किंवा 30 दिवसांच्या टप्प्यात वैधता असलेले प्लॅन्स सादर करतात किंवा थेट वर्षभराचे प्लॅन सादर करतात. परंतु बीएसएनलकडे विचित्र व्हॅलिडिटी असलेले अनेक प्लॅन्स आहेत. कंपनीकडे एक असा प्लॅन आहे जो एक वर्षाची नव्हे तर एक वर्ष एक महिन्याची वैधता देतो. BSNL चा 2,399 रुपयांचा प्लॅन 395 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे.

395 दिवसांची विचित्र वैधता

वर्षभराची वैधता असलेले इतर कंपन्यांचे प्लॅन पहिले तर त्यात 365 दिवसांची वैधता मिळते. परंतु सवयीप्रमाणे बीएसएनएलनं इथेही ग्राहकांना अतिरिक्त बेनिफिट्स देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीनं आपल्या 2,399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांची वैधता दिली आहे. अर्थात एक वर्ष आणि 30 (एक महिना) इतके दिवस हा प्लॅन वापरता येईल. जवळपास असेच बेनिफिट्स असलेला जियोचा प्लॅन 2879 रुपये तर एयरटेलचा प्लॅन 2,999 रुपयांमध्ये 365 दिवसांची वैधता देतो. हे देखील वाचा: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल OnePlus 11; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

BSNL च्या 2399 प्लॅनमधील बेनिफिट्स

वैधता तर आपण पाहिली आता या प्लॅनमधील अन्य बेनिफिट्स पाहू. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनिलमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस मोफत मिळतील. तसेच डेटा युजर्सना देखील कंपनीनं निराश केलं नाही. 2,399 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2जीबी डेटा वापरता येईल. हे बेनिफिट्स मुंबई आणि दिल्लीमध्ये रोमिंग दरम्यान देखील वापरता येतील.

डेली डेटा लिमिट संपल्यावर देखील ग्राहकांना इंटरनेट वापरता येईल फक्त स्पीड 40 kbps इतका होईल. डेटा एसएमएस आणि कॉलिंग बेनिफिट्ससह कंपनी 30 दिवसांसाठी PRBT सर्व्हिस देखील मोफत देत आहे, जिच्या मदतीनं तुम्ही तुमच्या आवडीची हॅलो ट्यून सेट करू शकता. तर EROS Now entertainment सर्व्हिस तुम्हाला 30 दिवस वापरता येईल, ज्यावर अनेक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये 30 दिवसांचे Lokdhun सब्सस्क्रिप्शन देखील मिळत आहे. हे देखील वाचा: सॅमसंग-ओप्पोचं टेन्शन वाढवण्यासाठी आला Vivo चा स्वस्त फोन; स्टायलिश लूकसह Vivo Y02 लाँच

BSNL चा 2999 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 2999 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना 365 दिवसांची वैधता मिळते. याचा अर्थ असा की एकदा रिचार्ज केल्यास तुम्हाला वर्षभर पुन्हा रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. तसेच या प्लॅनमध्ये युजर्सना डेली 3GB डेटा दिला जात आहे. जोडीला उपरोक्त ऑफर अंतर्गत युजर्सना मोफत 75GB data एक्स्ट्रा मिळेल. त्यांवर ग्राहकांना वर्षभरात एकूण 1170GB डेटा वापरता येईल. तसेच या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉलिंग अनलिमिटेड मिळते. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कितीही बोलू शकता. तसेच या रिचार्जमध्ये प्रतिदिन 100 SMS दिले जातात. फक्त कॉलिंग, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्स या प्लॅनमध्ये दिले जात नाहीत तर यात PRBT आणि Eros Now चा 30 दिवसांचा अ‍ॅक्सेस देखील मोफत दिला जात आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here