50MP कॅमेरा आणि 6GB RAM सह Motorola G Power ग्लोबली लाँच; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री

Highlights

  • Moto G Power 5G अमेरिकेत लाँच झाला आहे.
  • हा मोटो फोन MediaTek Dimensity 930 प्रोसेसर र चालतो.
  • या मोबाइलमध्ये 50MP Rear आणि 16MP Selfie कॅमेरा आहे.

Motorola नं ग्लोबल मंचावर आपल्या ‘जी’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Moto G Power 5G लाँच केला आहे. 50MP Camera, 6GB RAM आणि MediaTek Dimensity 930 चिपसेट असलेला हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Moto G Power 2022 ची जागा घेईल. सध्या हा फोन अमेरिकन बाजारात सादर करण्यात आला आहे, लवकरच याची एंट्री इतर देशांमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. चला जाणून घेऊया मोटोरोला जी पावर 5जीची किंमत, स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती.

मोटो जी पावर 5जीचे स्पेसिफिकेशन्स

  • 120Hz 6.5″ FHD+ display
  • 50MP triple rear camera
  • 6GB RAM
  • MediaTek Dimensity 930
  • 5,000mAh battery

मोटोरोला जी पावर 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्यात 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल स्टाईल असेलली ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. ही स्क्रीन 405पीपीआयला सपोर्ट करते. हे देखील वाचा: लवकरच येऊ शकतो फोल्डेबल Motorola Razr Plus 2023 स्मार्टफोन; लाँचपूर्वी दिसला सर्टिफिकेशन वेबसाइटवर

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G Power 5G फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जोडीला माययूएक्सची लेयर मिळते. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशन्सवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 930 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.2गीगाहर्ट्ज आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये आईएमजी 256 जीपीयू देण्यात आला आहे.

हा फोन आयपी रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर रेपेलेंट बनतो. यात 11 5G Bands, dual 4G VoLTE, WiFi, Bluetooth 5.3, USB-C port आणि 3.5एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो. मोटोरोलानं आपला नवीन मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. फोन एकदा चार्ज केल्यावर जवळपास 38 तास चालू शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. हे देखील वाचा: Infinix Note 30 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; गुगल प्ले कन्सोलवर दिसला फोन

मोटो जी पावर 5जीची किंमत

Moto G Power 5G कंपनी वेबसाइटवर दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लिस्ट करण्यात आला आहे. बेस मॉडेल 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 6जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत $299.99 यूएस डॉलरपासून सुरु होते जी 24,500 रुपयांच्या आसपास आहे. मोटो जी पावर 5जीच्या इंडिया लाँच बद्दल अद्याप काहीही सांगता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here