5000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Motorola चा नवीन फोन Moto E7 Plus

Motorola ने गेल्याच आठवड्यात ब्राजील मध्ये आपली ‘जी9 सीरीज’ वाढवत स्मार्टफोन Moto G9 Plus लॉन्च केला होता. हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह 64 मेगापिक्सलच्या क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. मोटो जी9 प्लस नंतर आता मोटोरोलाने आपल्या ‘ई सीरीज’ अंतर्गत पण नवीन स्मार्टफोन जोडत Moto E7 Plus लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन पण सध्या ब्राजील मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये एंट्री घेईल.

Moto E7 Plus

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस बद्दल बोलायचे तर हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बॉडी पार्टशी जोडल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे.

Moto E7 Plus ने एंडरॉयड 10 ओएस सह मार्केट मध्ये आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 ला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येतील.

हे देखील वाचा: Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E7 Plus डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto E7 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी मोटो ई7 प्लस मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Motorola का सर्वात स्वस्त 5G फोन Moto One झाला लॉन्च, जाणून घ्या 6 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत

मोटोरोलाने ब्राजील मध्ये Moto E7 Plus BRL 1,349 मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास होतात. या स्मार्टफोनने Amber Bronze आणि Navy Blue कलर मध्ये एंट्री घेतली आहे. Motorola आपला हा फोन भारतीय बाजारात कधी लॉन्च करेल, याबाबत अजूनतरी कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here