लेनोवोच्या मालकीच्या असलेल्या कंपनी मोटोरोलाने आपला नवीन मिड-रेंज 5G फोन सादर केला आहे. हा डिवाइस कंपनीने Motorola One 5G नावाने ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. पण हा फोन कंपनीच्या Moto G 5G Plus चा रिब्रँडेड वर्जन वाटत आहे. दोन्ही फोन्सची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. Moto One 5G ने कंपनी Apple iPhone SE ला टक्कर देण्याचा प्रयत्न करेल. कमी किंमतीत 5G, 5000mAh बॅटरी आणि अनेक फीचर्स असलेला हा डिवाइस भारतात येईल कि नाही याची अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
Moto One 5G ची डिजाइन पाहता अगदी Moto G 5G Plus प्रमाणे आहे. मोटोरोला वन 5G पण कंपनीने फुलव्यू डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन मधील स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला डावीकडे डुअल पंच-होल आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे चौकोनी आकारात आहे. तसेच उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर बटन आहे जो फिंगरप्रिंट सेंसरचे काम करतो.
कॅमेरा सेगमेंट बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये डुअल पंच होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात अपर्चर f/2.0 सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि अपर्चर f/2.2 सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा शूटर आहे. तसेच मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. चौकोनी कॅमेरा सेटअप सह येणारा हा मोटोरोलाचा पहिला फोन आहे. फोनच्या मागे अपर्चर f/1.8 सह 48 मेगापिक्सलचा मेन शूटर,अपर्चर f/2.2 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड स्नॅपर, अपर्चर f/2.2 सह 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि अपर्चर f/2.2 सह 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.
सिक्योरिटीसाठी फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. सोबत Google Assistant सपोर्ट मिळेल. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 20W फास्ट वायर चार्जिंग सह येते. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शंस मध्ये 5G, 4G, डुअल-बॅंड वाई-फाई, NFC, ब्लूटूथ v5.1, GPS / A-GPS, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी USB टाइप- C पोर्टचा समावेश आहे.
Moto One 5G स्मार्टफोन मध्ये 21:9 आस्पेक्ट रेश्यो सपोर्ट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची स्क्रीन साइज 6.7-इंच FHD+(1,080×2,520 पिक्सल) आहे. एचडी प्लस डिस्प्ले सह फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश्ड रेटला सपोर्ट करतो. फोन एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे, जो 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज ऑप्शन सह येतो. तसेच फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येईल.
मोटोरोला वन 5जी एक सिंगल 4जीबी + 128जीबी स्टोरेज वेरीएंट मध्ये येतो, ज्याची किंमत 500 डॉलर (जवळपास 36,600 रुपये) आहे आणि याचा रंग ऑक्सफोर्ड ब्लू आहे. फोनचा एक वेरिझोन वेरिएंट पण ऑक्टोबर पासून येईल.
















