COVID Nasal Vaccine: इंजेक्शन नको मग नाकावाटे घ्या कोरोना बूस्टर डोस; असं करा ऑनलाइन बुकिंग

कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे, त्यामुळे भारत सरकारनं नव्यानं COVID-19 विरोधात नेजल वॅक्सीन Incovacc देण्याची घोषणा केली आहे. ही COVID वॅक्सीन जगातील पहिला नीडलेस लस आहे आणि नाकावाटे दिली जाईल. भारत बायोटेकनं विकसित कोरोनाची ही लस 18 वर्षांवरील सर्वांना देता येईल. इंट्रानेजल वॅक्सीन बूस्टर डोसचे काम करेल आणि सध्या खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होईल. वॅक्सीन स्लॉट सरकारच्या वॅक्सीन पोर्टल कोविनच्या माध्यमातून ऑनलाइन बुक करता येईल. हे तेच पोर्टल आहे जिथे कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनचे डोस बुक करण्यात आले होते.

नेजल वॅक्सीन ऑनलाईन कसं बुक करायचं

नेजल वॅक्सीन ऑनलाइन बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या डिवाइसवर CoWIN पोर्टल ओपन करा. कोविड पोर्टल लिंक https://www.cowin.gov.in

  • आता तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरनं लॉगइन करा.
  • इथे तुम्हाला शेड्यूल ऑप्शन शोधावा लागेल.
  • त्यानंतर पिनकोड किंवा जिल्ह्याचं नाव टाकून खाजगी वॅक्सीनेशन सेंटर शोधा.
  • तुमच्या जवळच्या वॅक्सीनेशन सेंटरची निवड करा.
  • त्यानंतर नेजल वॅक्सीन बूस्टर शॉटसाठी वेळ निवडा.
  • त्यानंतर वॅक्सीनेशन स्लॉट बुक करा.
  • कोविन (Cowin) पोर्टलवर गेल्या शुक्रवारपासून नेजल वॅक्सीनसाठी ऑनलाइन बुकिंग सुरु झाली आहे.

COVID-19 चं नेजल वॅक्सीन कोणासाठी आहे?

वर सांगितल्याप्रमाणे देशातील सर्व नागरिक ज्यांचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे ते इनकोवॅक – नेजल कोविड वॅक्सीन घेऊ शकतात. NDTV च्या रिपोर्टनुसार, हा एक हेटरोलोजस बूस्टर वॅक्सीन डोज आहे. म्हणजे हे ज्यांनी वॅक्सीन कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनचे दोन डोस घेतलेत, ते देखील घेऊ शकतात. हे देखील वाचा: Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत

तसेच Times of India च्या रिपोर्टनुसार, नेजल वॅक्सीन नाकावाटे दोन वेळ दिलं जाईल. तसेच, पहिल्या आणि दुसऱ्या डोस दरम्यान चार आठवड्याचं अंतर असलं पाहिजे. म्हणजे एकूण 8 थेंब (0.5 मिली), प्रत्येक नासिकेत चार, प्रति डोस दिले जातील. नेजल वॅक्सीन 2-8 डिग्री सेल्सियसवर स्टेबल राहते.

नेजल वॅक्सीनची किंमत किती?

Incovacc च्या नेजल वॅक्सीनच्या भारतीय किंमतीची माहिती अद्याप उपलब्ध नाही. लसीच्या किंमतीची माहिती मिळताच अपडेट केली जाईल.

नेजल वॅक्सीनचे फायदे?

भारत बायोटेकनुसार, इनकोवॅक नेजल वॅक्सीनचे अनेक फायदे आहेत, जे पुढे सांगण्यात आले आहेत.

  • ही लस त्या लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते कारण ही वॅक्सीन नीडल फ्री आहे आणि नाकावाटे दिली जाते.
  • ही वॅक्सीन नाकावाटे दिली जाईल आणि कोरोना विरोधात चांगली इम्यून सिस्टम विकसित करण्यास मदत करेल.
  • तसेच सुईमुळे होणाऱ्या संक्रमणाचा धोका टळेल.
  • ही वॅक्सीन सोप्या पद्धतीने दिल्यामुळे जास्त कुशल कर्मचाऱ्यांची गरज नाही.

Incovacc नेजल वॅक्सीन ट्रायल, साइड इफॅक्ट, अप्रूवल आणि खूप काही

Incovacc नेजल वॅक्सीनची फेज 3 ट्रायल 3000 लोकांमध्ये झाली आहे ज्यामुळे चार आठवड्यात लोकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली झाल्याचे दिसून आले. साइड इफॅक्ट पाहता या वॅक्सीनमुळे काही लोकांना डोकेदुखी, ताप, नाक वाहने आणि शिंका, असा त्रास दिसून आला. तसेच काही लोकांना अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन देखील झाल्या आहेत. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

कंपनीनुसार, पहिली लस घेतल्यामुळे ज्या लोकांना गंभीर अ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्शन किंवा जोरदार ताप आला होता त्यांनी नेजल वॅक्सीनचा बूस्टर डोस टाळावा. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं नेजल वॅक्सीनला नोव्हेंबरमध्ये मंजूरी दिली होती. परंतु ही वॅक्सीन फक्त आपातकालीन वापरासाठी उपलब्ध आहे. भारत बायोटेकनं दावा केला आहे की इनकोवॅक वॅक्सीनेशन नंतर कोविड-19 संक्रमणाचा धोका अत्यंत कमी होतो.

Published by
Siddhesh Jadhav