Amazon Extra Happiness Days sale: पाहा कोणत्या लॅपटॉपवर मिळत आहेत सर्वात चांगली डील

जर तुम्ही ह्या फेस्टिवल सीजन दरम्यान नवीन लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर सध्या अ‍ॅमेझॉन एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये आसुस, डेल, एचपी, एसर सारख्या ब्रँडच्या लॅपटॉपवर तुम्हाला चांगली सूट मिळेल. ह्या सेलमध्ये तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर एचडीएफसी बँक ईएमआय ट्रँजॅक्शन, बँक ऑफ बडौदा क्रेडिट कार्ड आणि वनकार्डवर 10 टक्के इन्स्टंट सूट देखील मिळत आहे. चला जाणून घेऊया सेल दरम्यान लॅपटॉपवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची माहिती…

Acer Aspire Lite 11th Gen Intel Core i5 Laptop

जर तुम्ही डेली टास्कसाठी लॅपटॉप शोधत असाल तर एसर अस्पायर लाइट एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. थिन फॉर्म फॅक्टरसह प्रीमियम लुक देतो. लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे आणि 180-डिग्री हिंज डिजाइनसह येतो. याची बॅटरी लाइफ मोठी आहे आणि ह्यात व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी एचडी वेबकॅमची सुविधा आहे. या लॅपटॉपमध्ये शानदार साउंड एक्सपीरियंससाठी Nahmic Audio आहे. लॅपटॉप इंटेल कोर i5-1155G7 प्रोसेसरसह येतो आणि ग्राफिक्ससाठी Intel Iris Xe जीपीयू देण्यात आला आहे.

सेलिंग प्राइस: 42,999 रुपये

डील प्राइस: 37,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

MSI Modern 15

एमएसआय मॉडर्न 15 बजेट रेंजमधील थिन आणि लाइट लॅपटॉप आहे, जो पावरफुल परफॉर्मन्स देतो. हा 11व्या जेनरेशनच्या इंटेल कोर i5-1155G7 प्रोसेसरवर चालतो. ह्यात स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेटसह 40CM FHD IPS-लेव्हल डिस्प्ले आहे. हा 16GB DDR4 ड्युअल चॅनेल रॅम आणि 512GB NVMe PCIe Gen3x4 SSD सह आला आहे. हा स्मूद आणि फास्ट परफॉर्मन्स देतो. लॅपटॉपला इमर्सिव ऑडियोसाठी Hi-Res सर्टिफिकेशन मिळालं आहे. हा लॅपटॉप खूप मजबूत पण आहे. ह्याला MIL-STD-810G मिलिट्री स्टँडर्ड सर्टिफिकेशन मिळालं आहे.

सेलिंग प्राइस: 44,990 रुपये

डील प्राइस: 36,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 14X OLED

ASUS Vivobook 14X OLED हायएन्ड लॅपटॉप आहे, जो क्रिएटिव्ह कामांमध्ये पावरफुल परफॉर्मन्स देतो. हा इंटेल कोर i9-13900H 13 व्या जेनरेशनच्या प्रोसेसरसह येतो, ज्याला NVIDIA GeForce RTX 3050 GDDR6 4GB VRAM डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डची जोड देण्यात आली आहे. तसेच, लॅपटॉपमध्ये चांगल्या मल्टीटास्किंग एक्सपीरियंससाठी 16GB DDR4 रॅम मिळतो. ह्यात 180-डिग्री ले-फ्लॅट हिंज आहे. लॅपटॉपमध्ये तुम्हाला 14-इंच 2.8K (90Hz) VESA-सर्टिफाइड OLED डिस्प्ले मिळतो.

सेलिंग प्राइस: 1,09,990 रुपये

डील प्राइस: 1,04,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HP Laptop 15

HP लॅपटॉप 15 क्रिस्प व्हिज्युअलसाठी 15.6-इंच FHD डिस्प्लेसह आला आहे. ह्यात स्मूद परफॉर्मन्ससाठी Intel Core i5-1235U प्रोसेसर देण्यात आला आहे. हा इंटीग्रेटेड Intel Iris Xe ग्राफिक्ससह येतो. लॅपटॉप क्रिएटिव्ह कामांमध्ये देखील स्मूद कामगिरी करतो. लॅपटॉप विंडोज 11 होमवर चालतो आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट एडिशन 2021 प्री इंस्टाल मिळतात. लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 रॅम आहे आणि एकदा चार्ज केल्यावर 7 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ मिळते.

सेलिंग प्राइस: 59,990 रुपये

डील प्राइस: 47,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Dell 15 Laptop

तुम्ही डेली टास्कसाठी डेल 15 लॅपटॉपचा देखील विचार करू शकता. हा TÜV रीनलँड आणि डेल कम्फर्टव्यू सह 15.6-इंच FHD सह येतो. ह्यात तुम्हाला Intel Core i5-1135G7 11व्या जेनरेशनचा प्रोसेसर मिळतो. चांगल्या लॅपटॉप एक्सपीरियंससाठी ह्यात 8 जीबी रॅम देखील आहे. लॅपटॉपमध्ये इमर्सिव ऑडियोसाठी 2 स्पिकर देखील मिळतात. ह्याचा लिफ्ट हिंज टायपिंग सोपी करतो.

सेलिंग प्राइस: 50,750 रुपये

डील प्राइस: 41,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 15

Asus Vivobook 15 मध्ये 15.6-इंच FHD अँटी-ग्लेयर डिस्प्ले आहे. हा 45 टक्के NTSC कव्हरेज देतो. लॅपटॉपमध्ये कंपनीनं इंटेल कोर i7-12650H प्रोसेसरचा वापर केला आहे. सॉफ्टवेयर पाहता, हा विंडोज 11 होमवर चालतो आणि ह्यात प्रीइंस्टॉल ऑफिस होम आणि स्टुडंटचा समावेश आहे. ह्यात 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. लॅपटॉप रेग्युलर युजसह 6 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देतो.

सेलिंग प्राइस: 64,990 रुपये

डील प्राइस: 56,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 16 (2023)

ASUS Vivobook 16 (2023) टॉप परफॉर्मन्स असलेला लॅपटॉप आहे, जो प्रत्येक काम सहज हँडल करू शकतो. ह्यात 13व्या जेनरेशनचा Intel Core i9-13900H प्रोसेसर आणि इंटीग्रेटेड Intel Iris Xe ग्राफिक्स आहे, जो चांगली परफॉर्मन्स देतो. लॅपटॉपमध्ये 16-इंच (16:10) एफएचडी आयपीएस-लेव्हल नॅनोएज डिस्प्ले आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी ह्याला TUV रीनलँड सर्टिफिकेशन पण मिळालं आहे. ह्या लॅपटॉपवर टायपिंग करणं खूप सोपं आहे. हा 180-डिग्री ले-फ्लॅट हिंजसह येतो. ह्यात कंपनीनं 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे.

सेलिंग प्राइस: 94,990 रुपये

डील प्राइस: 78,490 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

Dell Inspiron 5430 Laptop

Dell Inspiron 5430 पावरफुल हार्डवेयर असलेला हायएन्ड थिन आणि लाइट लॅपटॉप आहे. ह्यात 14-इंच (16:10) FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा अर्थ असा आहे की मशीन खूप पोर्टेबल आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी ह्यात DellComfortView देखील मिळतो. हा एआय बॅकग्राउंड नॉइज कॅन्सलेशनसह एफएचडी रिजॉल्यूशन वेबकॅमसह येतो. ह्यात बॅकलिट, स्पिल-विरोधी कीबोर्ड आहे. पोर्टेबल 13व्या जेनरेशनच्या इंटेल i5-1335U प्रोसेसरवर चालतो, ज्यात 16 जीबी LPDDR5 रॅम आणि इंटीग्रेटेड Intel Iris Xe जीपीयू आहे. ह्यात थंडरबोल्ट 4.0 पोर्ट देखील मिळतो. ह्यात इमर्सिव ऑडियो एक्सपीरियन्ससाठी डॉल्बी अ‍ॅटमॉस स्पॅशियल ऑडियोचा सपोर्ट देखील मिळतो.

सेलिंग प्राइस: 74,490 रुपये

डील प्राइस: 69,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook S15 OLED 2022

ASUS Vivobook S15 OLED 2022 मध्ये लॅपटॉपमध्ये 15.6-इंच FHD OLED डिस्प्ले आहे. ह्यात कंपनीनं 12व्या जेनरेशनच्या इंटेल ईवीओ कोर i5-12500H प्रोसेसर चा वापर केला आहे. तसेच, ग्राफिक्ससाठी इंटीग्रेटेड इंटेल आयरिस एक्सई जीपीयूचा समावेश करण्यात आला आहे. मल्टीटास्किंग एक्सपीरियंससाठी ह्यात 16GB रॅम मिळतो. ह्यात 180-डिग्रीचा हिंज आहे आणि वेब कॉन्फ्रेंसिंग एक्सपीरियंससाठी 3DNR वेबकॅमची सुविधा देण्यात आली आहे.

सेलिंग प्राइस: 74,990 रुपये

डील प्राइस: 60,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Xiaomi Notebook Ultra Max

Xiaomi Notebook Ultra Max लॅपटॉप 15.6-इंच 3.2K (90Hz) डिस्प्लेसह येतो. ह्यात डीसी डिमिंगला सपोर्ट आणि टीयूवी रीनलँड सर्टिफिकेशन देखील मिळालं आहे. लॅपटॉपमध्ये हाय-स्पीड डेटा ट्रांसफरसाठी थंडरबोल्ट 4 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देखील मिळतो. ह्यात 16GB रॅम आणि 512GB NVMe SSD आहे. क्विक ऑथेंटिकेशन आणि अनलॉकिंगसाठी हा बिल्ट-इन फिंगरप्रिंट रीडरसह देखील येतो. ह्यात 11व्या जेनरेशनचा इंटेल टायगर लेक कोर i5-11320H प्रोसेसर आहे. लॅपटॉप 70Wh बॅटरीसह येतो, जो संपूर्ण दिवसाची बॅटरी लाइफ देऊ शकतो.

सेलिंग प्राइस: 52,999 रुपये

डील प्राइस: 45,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here