अखेर Apple नं टाइप सी चार्जिंग पोर्टचा समावेश आपल्या डिवाइसमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. इतकीवर्ष लायटनिंग पोर्ट वापरल्यानंतर आज जगभरात लाँच झालेल्या नव्या जेनरेशनच्या iPad आणि iPad Pro मध्ये अँड्रॉइड प्रमाणे टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळेल. iPad 2022 मध्ये A14 Bionic चिप आणि iPad Pro 2022 नवीन जेनरेशनची M2 Chip देण्यात आली आहे. iPadOS 16 वर चालणारे हे आयपॅड Apple Pencil आणि Magic Keyboard ला सपोर्ट करतात.
iPad 2022 चे स्पेसिफिकेशन्स
Apple iPad 2022 मध्ये 10.9 इंचाचा Liquid Ratina डिस्प्ले 2360×1640 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे, जो 500 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. अॅप्पलनं डिस्प्लेमध्ये ट्रू-टोन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. तसेच यात Touch ID सपोर्ट देखील देण्यात आला आहे. iPad 2022 चार नव्या कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा iPad जुन्या A14 Bionic चिपसह येतो, ज्यात चांगल्या परफॉर्मन्ससह एक दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल. हे देखील वाचा: व्हीएफएक्समुळे थिएटर गाजवणारा Brahmastra ‘या’ दिवशी होणार OTT वर रिलीज
नव्या आयपॅडमध्ये कॅमेरा फीचर्स देखील अपग्रेड करण्यात आले आहेत. iPad 2022 च्या मागे 12MP चा वाइड अँगल कॅमेरा मिळतो, जो 4K व्हिडीओ कॅप्चर करू शकतो. तसेच फ्रंटला देखील 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळतो. नव्या आयपॅडमध्ये 5G आणि Wi-Fi6 सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात, तसेच USB Type C चा देखील समावेश करण्यात आला आहे.
iPad Pro 2022 चे स्पेसिफिकेशन्स
Apple iPad Pro चा नवीन मॉडेल 11 इंच आणि 12.9 इंचाच्या दोन साइज आणि सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल. नवीन जेनरेशनच्या iPad Pro मध्ये 16GB पर्यंत RAM आणि 128GB/256GB/512GB/1TB आणि 2TB पर्यंत स्टोरेज ऑप्शन मिळतात. Apple iPad Pro 2022 च्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ProMotion फीचर देण्यात आलं आहे. तसेच हा मिनी LED डिस्प्ले टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे आणि XDR ला सपोर्ट करतो. नव्या आयपॅड प्रो मध्ये लेटेस्ट M2 चिप, Wi-Fi6, 5G आणि USB Type C कनेक्टिव्हिटी फीचर मिळतं. आयपॅड प्रोच्या मागे 12MP + 12MP चा ड्युअल कॅमेरा आणि सेल्फीसाठी 12MP चा सिंगल कॅमेरा मिळतो.
iPad, iPad Pro 2022 ची किंमत
Apple iPad चा Wi-Fi Only मॉडेल $499 (जवळपास 41,000 रुपये) मध्ये उपलब्ध होईल. तर Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत $599 (जवळपास 49,325 रुपये) आहे. हा ब्लू, पिंक, येलो आणि सिल्व्हर कलर ऑप्शन्स 26 ऑक्टोबरपासून 28 देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 10 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन OPPO A17k; मिळतेय 5,000mAh बॅटरी आणि 7GB RAM ची पावर
Apple iPad Pro 2022 च्या 11 इंचाच्या Wi-Fi Only मॉडेलची किंमत 81,900 रुपये आहे. तर Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत 96,900 रुपये आहे. तसेच 12.9 इंचाचा Wi-Fi Only मॉडेल 1,12,900 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तर Wi-Fi + Cellular मॉडेलसाठी 1,27,900 रुपये मोजावे लागतील. नवीन आयपॅड प्रो सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलरमध्ये 26 ऑक्टोबरला खरेदीसाठी उपलब्ध होतील.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.















