व्हीएफएक्समुळे थिएटर गाजवणारा Brahmastra ‘या’ दिवशी होणार OTT वर रिलीज

Brahmastra On OTT: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) मोठ्या पदड्यावर 9 सप्टेंबर 2022 ला रिलीज झाल्यानंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे. बऱ्याच कालावधीनंतर एखाद्या हिंदी चित्रपटाने (Bollywood Movie) थिएटरमध्ये दर्शकांना आणले होते. परंतु तरीही तुम्ही चित्रपटगृहांमध्ये या सिनेमाच्या व्हिएफक्सचा अनुभव घेतला नसेल तर काळजी नको. आता तुम्ही हा चित्रपट घर बसल्या आरामात आपल्या टीव्ही स्क्रीन किंवा मोबाइल स्क्रीनवर बघू शकता, कारण आता हा OTT वर रिलीज होण्यासाठी एकदम तयार आहे.

या दिवशी ओटीटीवर रिलीज होणार Brahmastra

जर तुम्ही देखील रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra OTT Release Date) च्या ओटीटी रिलीजची वाट बघत असाल तर तुम्हाला जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. ब्रम्हास्त्र 4 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येईल. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या मूळ हिंदी व्हर्जनसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम व्हर्जन देखील OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. हे देखील वाचा: 10 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन OPPO A17k; मिळतेय 5,000mAh बॅटरी आणि 7GB RAM ची पावर

हा चित्रपट Disney Plus Hotstar वर स्ट्रीम केली जाईल. परंतु ही अधिकृत माहिती नसून मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात आलं आहे की रणबीर कपूरचा लोकप्रिय चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे आणि दिवाळीच्या एक दिवस आधी फॅन्सना हे गिफ्ट मिळेल. काही रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 28 ऑक्टोबरला स्ट्रीम होईल, परंतु याबाबत कोणतीही अधिकुर्ट माहिती मिळालेली नाही. लीक्स रिपोर्ट्स समोर आल्यानंतर लवकरच ऑफिशियल माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई

Brahmastra एक अ‍ॅडवेंचर ड्रामा मूव्ही आहे, जी ट्रायोलॉजी आहे. या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील आणि ही मालिका पूर्ण होईल. तसेच यातील शाहरुख खानच्या पात्राची गोष्ट सांगणारा एक वेगळा चित्रपट तयार करावा अशी मागणी देखील चाहत्यांनी केली आहे, जिचा विचार करत असल्याचं ब्रम्हास्त्रचे दिग्दर्शक आयन मुखर्जी म्हणाले आहेत. या चित्रपटाने रिलीजनंतर 25 दिवसांमध्ये वर्ल्डवाइड 425 कोटी रुपयांची कमाई केली होती. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर

दुसरा पार्ट लवकरच होणार रिलीज

‘ब्रम्हास्त्र: पार्ट वन-शिवा’ या चित्रपटात रणबीर कपूर शिवाच्या मुख्य भूमिकेत आहे, ज्याच्याकडे प्राचीन अस्त्राची ताकद आहे. आलीय भटनं ईशाची भूमिका साकारली आहे जी शिवाला त्याच्यातील शक्तीचा शोध घेण्यासाठी मदत करते. चित्रपटात शाहरुख खान आणि दाक्षिणात्य सुपर स्टार नागार्जुन यांचे कॅमिओ आहेत, तर मौनी रॉयनं जुनून नावाच्या व्हिलनची भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात गुरुची भूमिका बजावत आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ च्या रिलीजनंतर याच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु झाली आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आमिर खान महत्वाच्या रोलमध्ये दिसू शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here