31 जुलैला लाँच होईल New JioBook laptop; जाणून घ्या संभाव्य किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Highlights

  • आगामी जियोबुक अ‍ॅमेझॉन इंडियावर विकला जाईल.
  • ह्याची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
  • हा जुन्या लॅपटॉपपेक्षा हलक्या स्पेसिफिकेशन्ससह येऊ शकतो.

Jio आपला सेकंड-जनरेशन JioBook भारतीय बाजारात आणण्यासाठी तयार आहे. कंपनी ह्या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 जुलैला आपला नवीन जियोबुक लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे. आता तर अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून New JioBook Laptop चा टीजर देखील जारी करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया आगामी जियोबुक बाबत सर्वकाही.

New JioBook Laptop स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉननं लॅपटॉपसाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे. ह्या साइटवर टीजर इमेज आणि लॅपटॉपचे काही खास फीचर्स समोर आले आहेत. लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की ह्याची बॉडी हलकी असेल. कारण गेल्यावर्षीचा मॉडेल 1.2 किलोग्रामचा होता तर नवीन अपग्रेडेड व्हर्जनचं वजन 990 ग्राम असेल.

तसेच कन्फर्म माहिती देण्यात आली आहे की लॅपटॉप 4G कनेक्टिव्हिटीसह येईल. नवीन जियोबुकमध्ये JioOS (अँड्रॉइड बेस्ड) आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. त्याचबरोबर कंपनी ह्यात संपूर्ण दिवस चालणारी बॅटरी देऊ शकते.

JioBook price (संभाव्य)

कंपनीनं आपला पहिल्या-जनरेशनचा जियोबुक 15,799 रुपयांमध्ये सादर केला होता. जो Reliance Digital stores वरून विकत घेता येईल. तर, नवीन जनरेशनच्या लॅपटॉपची किंमत देखील 20,000 पेक्षा कमी असू शकते. हा लॅपटॉप फक्त अ‍ॅमेझॉनवर विकला जाणार नाही तर रिटेल स्टोर्सवरून देखील ह्याची खरेदी करता येईल.

विशेष म्हणजे कंपनीनं आपला हा बजेट फ्रेंडली लॅपटॉप सर्वप्रथम IMC 2022 मध्ये सादर केला होता. जुलैमध्ये Jio चा दुसरा लॅपटॉप भारतात लाँच होईल. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपला जिओ भारत 4जी फीचर फोन सादर केला आहे, ज्याची किंमत 999 रुपये आहे. कारण JioBook वर देखील 4G सिमची आवश्यकता होती आहे, त्यामुळे ह्या लॅपटॉप सह कंपनी किफायती डेटा प्लॅन देखील सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here